foreign scholarship esakal
नाशिक

परदेश शिष्यवृत्ती घ्यायचीय? अर्जाची मुदत वाढविली

अरूण मलाणी

नाशिक : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी, संशोधनात्मक अभ्यासक्रमाच्या (पीएच.डी.) अध्ययनासाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१- २२ साठी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले होते. अर्जाची मुदत वाढविली असून, आता ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. (foreign-scholarships-Application-extension-nashik-marathi-news)

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्जाची मुदतवाढ

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार अर्जाच्‍या मुदतीत वाढ केली आहे. योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त (पुणे) डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रँकमधील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर केली जाईल. योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना विमानप्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळेल. अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : संसद परिसरात एनडीए, इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT