नाशिक

नऊ दिवस तपासणी औषधोपचारांसह मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा! कोटमगाव यात्रेत कुणाल दराडे फाउंडेशनचे मोफत आरोग्य शिबिर

CD
पान-२ मस्ट YEO26B27151 येवला : जगदंबा मातेच्या यात्रेत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी युवा नेते कुणाल दराडे,ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, भाऊसाहेब आदमने व पदाधिकारी. -------------- ३६-२ तपासणी औषधोपचारांसह मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया कोटमगाव यात्रेत दराडे फाउंडेशनचे शिबिर सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१३ : कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या वार्षिक यात्रोत्सवात कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे सलग अकराव्या वर्षी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. घटी बसलेल्या भाविकांसह दर्शनाला येणाऱ्या भाविकांची ही मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात येत आहे. या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सही लाभ रुग्णांना दिला जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर संपूर्ण नऊ दिवस चोवीस तास सुरू राहणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. आवश्यकतेनुसार मोफत गोळ्या व औषधांचे वाटपही करण्यात येत आहे. शिबिरात थंडी-ताप, मलेरिया, गॅस्ट्रोसह उपवासामुळे डोकेदुखी व पित्त या होणाऱ्या त्रासाची तपासणी करून जागेवर मोफत उपचार केले जात आहे. शिबिराचे विशेष वैशिष्ट्य़ म्हणजे गरजू वृद्ध आणि भाविकांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे म्हणाले,‘ जगदंबा माता हे त्यांचे आराध्य दैवत आहे. २०१५ मध्ये सामाजिक कार्यात पदार्पण केले. तेव्हा याच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाकार्याची सुरुवात झाली. यात्रा उत्सवादरम्यान आमदार किशोर दराडे यांनी आरोग्य शिबिराला भेट देऊन पाहणी केली. जगदंबा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; अप-डाउन मार्गावरील लोकल रखडल्या, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

Vani Crime : एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष दाखवून पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला लुटले...; तिघांना अटक

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

SCROLL FOR NEXT