YEO26B27198
पाटोदा : येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.
---------------
पाटोद्यात २५० जणांची
मोफत आरोग्य तपासणी
भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त बनकर परिवाराचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१६ : मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर व कुटुंबीयांकडून मोफत आरोग्य शिबिर झाले. यात २५० हून अधिक रुग्णांची तपासणी झाली असून २७ जणांवर नाशिक येथे उपचार केले जाणार आहे. सुमारे ७०० गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
मंत्री भुजबळांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहकार नेते अंबादास बनकर, मविप्रचे संचालक नंदकुमार बनकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिर व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप पाटोदा येथील जनता विद्यालयात करण्यात आले होते. मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, जनता माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदे व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्यात आला.
आरोग्य शिबिरात हृदयरोग, मेडिसिन सर्जरी, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग आदी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी शिबिरात २५० रुग्णांची तपासणी केली. यातील २७ रुग्ण नाशिक येथे मोफत औषधोपचार घेण्यासाठी जाणार आहे. संजय बनकर यांनी प्रास्ताविक केले. श्री. भड, बाळासाहेब सोमासे यांनी सूत्रसंचालन केले.
-----------