नाशिक

नातं वैद्यकीय सेवेचं अन् आपुलकीचं! २३ वर्षांपूर्वी जन्मलेल्या चिमुकल्याची डॉक्टर बनून भेट डॉ.क्षत्रिय यांना कोटमगावच्या जगदंबा मंदिरात जुन्या आठवणींना उजाळा

CD
27190 कोटमगाव : तेवीस वर्षानंतर भेटलेल्या डॉ. राम यांच्यासोबत डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, डॉ. दीपाली क्षत्रिय यांचे स्वागत करताना जगदंबा देवस्थानचे पदाधिकारी. तेवीस वर्षांपूर्वी जन्मलेल्या युवकाची डॉक्टर बनून भेट डॉ. क्षत्रिय यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा, सकाळ वृत्तसेवा येवला, ता. १८ : वैद्यकीय सेवा ही केवळ उपचारांपुरती मर्यादित नसून ती माणसांच्या आयुष्याशी आणि भावनांशी अतूट नातं जोडते, याचा सुवर्णप्रत्यय श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा मंदिरात आला. तब्बल २३ वर्षांपूर्वी अवघ्या १ हजार ३०० ग्रॅम वजनाच्या अत्यंत नाजूक बाळाचा जीव वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय यांची, त्याच बाळाने चक्क ''डॉक्टर'' बनून भेट घेतली. हा अत्यंत भावुक प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि जुन्या आठवणींना सुखद उजाळा मिळाला. २६ वर्षांपासून डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय आणि भूलतज्ज्ञ डॉ. दीपाली क्षत्रिय यांना नवरात्रोत्सवातील महाआरतीच्या प्रसंगी हा अत्यंत अविस्मरणीय अनुभव आला. पारेगाव येथील ''आर्य निकेतन स्कूल''च्या संचालिका कल्पना व खुशाल गायकवाड यांचा मुलगा डॉ. राम याचा जन्म २३ वर्षांपूर्वी क्षत्रिय हॉस्पिटलमध्ये झाला होता. जन्माच्या वेळी त्याचे वजन अवघे १ हजार ३०० ग्रॅम इतके कमी होते. अशा अत्यंत नाजूक व चिंतातुर अवस्थेतील बाळाला जीवदान देण्यासाठी क्षत्रिय दांपत्याने मेहनत घेतली. त्यानंतर कष्टाने मोठे झालेले हेच बाळ उच्च शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनले आहे. श्री क्षेत्र कोटमगाव येथील जगदंबा मंदिरात योगायोगाने त्याची आपल्या जुन्या डॉक्टरांशी पुन्हा भेट झाली. एकेकाळी ज्या बाळाचे आयुष्य धोक्यात होते आणि ज्याची अतोनात चिंता होती, तेच बाळ आज डॉक्टर बनून समाजसेवेसाठी खंबीरपणे सज्ज झाले असल्याचे पाहून डॉ. क्षत्रिय भावुक झाले. २३ वर्षांपूर्वी हे नाजूक बाळ वाचवणे आमच्यासाठी एक मोठे आव्हान होते. आज तेच बाळ डॉक्टर बनून समाजसेवेच्या मार्गावर चालत असल्याचे पाहून माझ्या २६ वर्षांच्या वैद्यकीय सेवेचे आणि कष्टांचे आज खऱ्या अर्थाने फलित मिळाले. डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय (स्त्रीरोगतज्ज्ञ, येवला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

SCROLL FOR NEXT