नाशिक

गांधी तत्त्वज्ञान केंद्र

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी.... अँकर -- गांधी तत्त्वज्ञान केंद्रातर्फे सप्ताहात विविध उपक्रम -- गांधी विचारांचा विविध उपक्रमांतून जागर; मान्यवरांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्रातर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान गांधी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सप्ताहाचा प्रारंभ प्रतिमा पूजन व गांधी वंदनेने झाला. या वेळी सुरकला म्युझिकल ग्रुपचे व्यवस्थापक सुरेश चत्रे यांनी भजने सादर केली. याप्रसंगी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. तीन ऑक्टोबरला एकवीरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रंगभरण स्पर्धा झाली. यावेळी प्रा. डॉ. गोविंद पोद्दार, प्राचार्य आशालता भदाणे उपस्थित होते. चार ऑक्टोबरला श्रमदान शिबिराचे उद्‌घाटन डॉ. साजिदा शेख यांच्या हस्ते झाले. प्रा. बाजीराव पाटील व डॉ. निलेश रोटे उपस्थित होते. पाच ऑक्टोबरला धुळे कारागृहात गांधी विचार परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या वेळी धुळे कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे, पवन पोद्दार, नितीन ठाकूर, यशवंत हरणे, प्राचार्य डॉ. संजीव गिरासे, प्राचार्य भगवान पाटील, डॉ. पापालाल पवार आणि महाले उपस्थित होते. सहा ऑक्टोबरला श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी ‘महात्मा गांधी आणि खानदेश’ या विषयावर गुंफले. उद्घाटन अधिसभा सदस्य डॉ. एस. टी. पाटील यांनी केले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जितेंद्र तलवारे होते. सात ऑक्टोबरला नगांव (ता.धुळे) येथील गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला व विज्ञान महाविद्यालय येथे दुसरे पुष्प प्रा. जसपाल सिसोदिया यांनी ‘गांधी विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर गुंफले. उद्‌घाटन अधिसभा सदस्य प्रा. केदारनाथ कवडीवाले यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील, अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम, अमोल मराठे व डॉ. सुरेश शेलार उपस्थित होते. आठ ऑक्टोबरला जिजामाता कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धेने सप्ताहाचा समारोप झाला. या वेळी प्राचार्य अपर्णा पाटील आणि नितीन ठाकूर उपस्थित होते. सप्ताहभर गांधी जीवन चित्र प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यकारी संचालक डॉ. संजय ढोडरे, रोहिदास साळुंके व गणेश गवळी यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दुकानदाराला लाठ्या-काठ्यांनी मारहाण, लाथाबुक्क्याही मारल्या; CCTV व्हिडीओ समोर

Latest Marathi News Update : जमीन लिलावाच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

HP Laptop: एचपीचा प्रीमियम लॅपटॉप भारतात लाँच; तब्बल 160GB vRAM आणि जबरदस्त AI फीचर्ससह बाजारात एंट्री!

Sujay Vikhe Patil: सुजय विखे पाटील आणि विवेक कोल्हे एकत्र; रामगिरी महाराज म्हणाले, ‘खासदारकीची खुर्ची हवी’

SCROLL FOR NEXT