नाशिक

सोमवार पेठ येथील गणेश मंडळास जिल्ह्याचा द्वितीय पुरस्कार

CD
फोटो : A15058 नाशिक : द्वितीय पुरस्कारप्राप्त सोमवार पेठ येथील वेलकम सहकार्य मित्रमंडळ. -- सोमवार पेठचे गणेश मंडळ गणेशोत्सव स्पर्धेत द्वितीय सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. २२ : राज्य सरकारतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत इगतपुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनईने प्रथम, तर जुने नाशिक येथील सोमवार पेठमधील वेलकम सहकार्य मित्रमंडळ द्वितीय, तर नांदगावच्या श्री नीलमणी गणेश मंदिर पब्लिक ट्रस्टने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना शुक्रवारी (ता. १६) मुंबई येथे पुरस्कार वितरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय ३, राष्ट्रीय,३, राज्यस्तरीय ३, जिल्हास्तरीय ९४ आणि तालुकास्तरीय ३८ आशा १४१ सार्वजनिक मंडळांची स्पर्धेत निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्हानिहाय तीन पुरस्कार वितरित करण्यात आले. सोमवार पेठ भागातील वेलकम सहकार्य मित्रमंडळाने जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळाला. तर इगतपुरी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किल्ले कावनईने प्रथम आणि नांदगावच्या श्री नीलमणी गणेश मंदिर पब्लिक ट्रस्टने तृतीय क्रमांक पटकाविला. १४ ते २५ सप्टेंबर कालावधीत झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांची निवड संबंधित समित्यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा एकूण १४१ मंडळांची विजेते म्हणून निवड जाहीर करण्यात आली. विजेत्या मंडळांना पारितोषिकाची रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शुक्रवारी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर हाँगकाँग येथील महाराष्ट्र मंडळाने प्रथम, जपानमधील एडोगावा इंडिया कल्चर सेंटरने द्वितीय, तर जर्मनीतील हेसन इंडियन लेडीज असोसिएशन ॲन्ड पायोनिअर इंडियन्स ई.व्ही मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

IND vs NZ 1st T20I : भुवनेश्वर कुमार पुढच्या सामन्याला मुकणार? १६व्या षटकात नेमके काय घडले? Video Viral; बघा पुनरागमन कसे राहिले

सेट नाही खरा आहे 'दृश्यम'च्या विजय साळगावकरचा बंगला; ८५ वर्षीय महिला करतेय देखभाल, तुम्हाला पाहायचाय? हा घ्या पत्ता

डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले! बनावट गुणपत्रक अन् खोटी कागदपत्रे तयार करत...; BAMS प्रवेशाच्या नावाखाली तरुणाची ८ लाखांची फसवणूक

Latest Marathi News Live Update : तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी, बच्चू कडूंसह सहा जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT