Garden work going on in the premises of the Collectorate, Nashik. esakal
नाशिक

Independence Day 2023: जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वातंत्र्यदिनासाठी फुलणार उद्यान

सकाळ वृत्तसेवा

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार तयारी सुरू आहे.

स्वातंत्र्यदिनाचा मुख्य कार्यक्रम विभागीय महसूल कार्यालयात होत असला तरी, जिल्हाधिकारी कार्यालयातही दरवर्षी ध्वजवंदन होते, यंदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या कार्यक्रमासाठी मैदानावर हिरवळ फुलविली जात आहे. (garden to bloom for Independence Day 2023 in Collectorate premises nashik)

गतवर्षी सुमारे दीडशे फुटाचा ध्वज उभारण्यात आला. यंदा त्याभोवती मोकळ्या उद्यानात हिरवळ फुलविली जात आहे. तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या कामासाठी उद्यानातील जमिनीची मशागत करण्यात आली आहे.

हिरवळीचे लादी लावण्याचे काम सुरु आहे. आवारातील इतर उद्यानही सजविणे सुरू आहे. चारही बाजूला हिरवळ, विश्रांतीसाठी जागा अशा चौफेर परिसर सजविला जाणार आहे. परिसरातील झाडांच्या काही फांद्या काढल्या आहेत.

हिरवळ लादी अंथरूण तेथे हिरवळ फुलविली जाणार आहे. उद्यानाच्या सजावटीसाठी फुलांच्या रोपांच्या कुंड्या ठेवल्या जाणार आहे. स्वातंत्र्यदिन आठवड्यावर आल्याने आठवडाभरात कामकाज संपविण्यासाठी कामाला गती आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT