नाशिक

नाशिकच्या गौरी गर्जे आणि सिद्धी भांडारकर यांची सुवर्णभरारी

CD
फोटो : H33256 गौरी गर्जे, सिद्धी भांडारकरला पॅरा जलतरण स्पर्धेत तीन सुवर्ण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : जिद्द, मेहनत, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर नाशिकच्या गौरी गर्जे आणि सिद्धी भांडारकर या दोन पॅरा जलतरणपटूंनी १८ व्या राज्यस्तरीय पॅरा जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केली. दोघींनीही प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावत एकूण सहा सुवर्णपदकांची कमाई केली. विशेष म्हणजे, या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी भोपाळ येथे निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नाशिकच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या कर्तृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित १८ वी राज्यस्तरीय पॅरा जलतरण अजिंक्यपद स्पर्धा १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत विविध गटांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. नाशिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गौरी आणि सिद्धी यांनी आपापल्या गटांत उत्कृष्ट कामगिरी करत तीन, तीन सुवर्णपदके जिंकली आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. या दोघी प्रशिक्षक घनश्याम कुंवर सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करत आहेत. या दोन्ही खेळाडूंचे गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे, क्रीडाप्रेमी, महाविद्यालयीन वर्तुळ आणि नाशिककरांकडून अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांचा ३० मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत पार, तीन महत्त्वाचे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले; कसे आहेत मार्ग?

IND vs NZ 1st T20I: क्रिकेटपटू फुटबॉलचा सराव का करतात? अर्शदीप सिंगने घेतलेली विकेट पाहून मिळेल उत्तर... Video Viral

घरात घुसून भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, धारधार शस्त्राने वार अन् गोळीबार; घटनेनंतर २ गटात वाद, ६ जण जखमी

OnePlus Turbo 7 Pro: 10,000mAh बॅटरी अन् 200MP कॅमेऱ्यासह फ्लॅगशिप स्मार्टफोन होणार लाँच! पाहा भन्नाट फीचर्स...

Latest Marathi News Live Update : पुढची ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागणार नाही...! अमित शाह यांचा राहुल गांधीवर निशाणा

SCROLL FOR NEXT