नाशिक

जळगाव शहरात घुमणार गीत रामायणाचे सूर

CD
(बातमी आवश्‍यक) NSK26H33468 : श्रीधर फडके शहरात आज घुमणार गीत रामायणाचे सूर जळगाव, ता. २४ : गेली ७५ वर्षे मनामनावर अधिराज्य गाजवणारा ‘गीत रामायण’ हा संगीतमय कार्यक्रम रविवारी (ता. २५) सायंकाळी सातला शहरातील छत्रपती संभाजी राजे नाट्य संकुल येथे होणार आहे. डोपामीन क्रिएशन्स संस्थेतर्फे हा कार्यक्रम सादर होत आहे. पुणे आकाशवाणीच्या निमित्ताने या कार्यक्रमाची बीजे रुजली. ग. दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरांनी आणि संगीताने सजलेला हा कार्यक्रम म्हणजे गीत रामायण. आता हा कार्यक्रम श्रीधर फडके यांच्या सुरमधुर आवाजात होतो. वडिलांचा महान सांगीतिक वारसा समर्थपणे पुढे चालवत त्यांनी स्वतःची एक स्वतंत्र व वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कार्यक्रमात श्रीधर फडके (सादरकर्ते), तुषार आंग्रे (तबला), सुकन्या जोशी (निवेदिका), निकिता दांडेकर, मेधा चिडगुपकर, महेश देशपांडे (कोरस), आर्य पुरणकर, अतुल माळी (सिंथेसाइझर), चेतन परब (साइड रिदम) यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी आस्वाद घ्यावा. अशी विनंती डोपामीन क्रिएशन्सने केली आहे. तिकिटालय या संकेतस्थळावर या कार्यक्रमाची तिकिटे उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

Rashmika Mandanna: ‘त्या’ दिवसांत विजय असतो रश्मिकाचा आधार; अभिनेत्रीने सांगितली एक खास गोष्ट

Beed Theft : धुळे-सोलापूर महामार्गावर हॉटेलवर थांबलेल्या प्रवाशांच्या कारचे लॉक उघडून ६.५५ लाखांचे दागिने लंपास; बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT