corona report esakal
नाशिक

नाशिककरांनो! घरीच टेस्ट करून मिळवा 6 तासात कोरोना रिपोर्ट

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : गेल्‍या महिन्‍यात एप्रिलमध्ये कोरोना प्रादुर्भावाने (coronavirus) त्रस्‍त झालेल्‍या जिल्‍हावासीयांसाठी मे महिना दिलासादायक राहिला.अशातच कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या (corona free patients) संख्येत सातत्‍याने वाढ झाली. यामुळे ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत (active corona patients) मोठी घट झाली. अशातच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती कोविडचा संसर्ग झाल्यास तो लवकरात लवकर कळणे आवश्यक असते. त्यामुळे घरच्या घरीच टेस्ट करता येणार आहे. आणि रिपोर्टही अवघ्या 6 तासांत मिळेल. वाचा सविस्तर... (get-Corona-report-in-6-hours-nashik-marathi-news)

नाशिकमध्ये लवकरच ही सेवा

कोरानाची लागण झाल्यावर अनेकदा रिपोर्ट येण्यास विलंब लागतो. उशिरा उपचार सुरू झाल्याने अनेक रुग्ण गंभीर झाल्याचे तर अनेकांना प्राण गमवावे लागल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर घरच्या घरीच टेस्ट करीत अवघ्या 6 तासांत रिपोर्ट प्राप्त करून देण्यासाठी स्पाईस जेटच्या (स्पाईस हेल्थ) कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून नाशिकमध्ये लवकरच ही सेवा सुरु होणार आहे. मुंबई, नागपूर आणि औरंगाबादमध्ये कंपनीने ही लॅब सुरू केली आहे. लवकरच नाशिकमध्येही ती सुरू होणार असल्याचे संकेत कंपनीने ट्विटरद्वारे दिले आहेत.

6 तासांत मिळणार रिपोर्ट आणि तो ही 500 रुपयांत

सरकारी किंवा खासगी प्रयोगशाळांमधून आरटी-पीसीआर चाचणीसाठी 24 ते 48 तासांचा कालावधी लागतो. स्पाइसहेल्थने मात्र आपल्या प्रयोगशाळेतून सहा तासांतच आरटी-पीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट मिळत असल्याचा दावा केला आहे, शिवाय, या चाचण्यांसाठी कंपनी दिल्लीत अवघे पाचशे रुपये आकारत असल्याचे म्हटले आहे. या प्रयोगशाळेची दिवसाला तीन हजार आरटी-पीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT