पान-२--मेन
IGT26B08813---IGT26B08812
इगतपुरी : येथील शैलपुत्री घाटनदेवीच्या दर्शनासाठी शनिवारी भाविकांची लागलेली रांग. दुसऱ्या छायाचित्रात गर्दीने फुललेला परिसर. (छायाचित्र : विजय पगारे, इगतपुरी )
---------------------
घाटनदेवीच्या दर्शनासाठी उसळला जनसागर
----------
कावनई, पारदेवीला भाविकांची मांदियाळी : तीस हजारावर भाविकांमुळे महामार्ग देवी फुलला
----------
विजय पगारे : सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१७ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असणाऱ्या शैलपुत्री घाटनदेवी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रिघ लागली आहे. जिल्ह्यासह नगर, जालना, बीड, धुळे, जव्हार, मोखाडा, कल्याण, ठाणे, मुंबईसह विविध भागातून शनिवारी (ता.१७) सातव्या माळेचा मुहूर्त साधत पहाटेपासून भाविक दाखल झाले आहेत.
नवसपूर्तिसाठी विविध भागातून भाविक आल्याने घाटनदेवीचा परिसर फुलून गेला आहे. सातवी माळ आल्यामुळे शनिवारी सुमारे २५ ते ३० हजार भाविकांची उपस्थिती होती. मुंबई आग्रा महामार्ग देवी भक्तांमुळे फुलला होता. देवी मातेच्या जयघोषाने समस्त परिसर दुमदुमून गेला होता
सर्वाधिक गर्दीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई- आग्रा महामार्गालगतच घाटनदेवीचे मंदिर असल्याने येथे प्रत्येक जाणारा येणारा भाविक थांबल्याशिवाय राहत नाही. येथील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याबरोबरच ऐतिहासिक उंटदरी, रेल्वेचे बोगदे, ब्रिटीशकालिन पूल व या परिसरातील कसारा घाटातील सौदर्य टिपण्यासाठी येथे गर्दी उसळली आहे.
इगतपुरी शहराजवळील त्रिंगलवाडी किल्याच्या मधोमध असणाऱ्या खिंडीत बसलेल्या सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत. दुपारनंतर यात अजून भर पडली तसेच बाहेरगावच्या भाविकांच्या गर्दीमुळे खिंडीचा परिसर फुलून गेला होता
१६-१
कावनईत भाविकांची गर्दी
सिंहस्थ काळापासून ओळख असणाऱ्या व तालुक्याचे दैवत असणाऱ्या कावनई येथील कामाक्षी मातेच्या दर्शनासाठीही कालपासून गर्दी उसळली आहे. येथे दिवसभरात सुमारे १० ते १५ हजारापेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली. कावनईच्या पंचक्रोशीसह नाशिक, टाकेद, खेड, धामणगाव साकूर, शेणित, मुकणे, जानोरी, देवळे, घोटी, खैरगाव, नांदगाव व आदी भागातील भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.