Girish Mahajan statement on maratha reservation nashik news 
नाशिक

Girish Mahajan: कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देता येणार नाही : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan: राज्यात मराठा आरक्षणाबाबत कोणतेही चुकीचे काम होणार नाही. सगळ्या नोंदी जुन्या आहेत. आम्हाला जे आरक्षण द्यायचे आहे ते टिकणारे द्यायचे आहे. कुणबी म्हणून सरसकट आरक्षण देता येणार नाही.

परंतु मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे, असे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. शिवसेनचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे उद्धव सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Girish Mahajan statement on maratha reservation nashik news)

आदिवासींच्या बिऱ्हाड मोर्चाशी चर्चा करण्यासाठी मंत्री महाजन नाशिक दौऱ्यावर होते, त्या वेळी श्री. महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील सुरू असलेल्या वादावर ते म्हणाले, की राज्यात वातावरण दूषित होता कामा नये. आम्ही दोघांना देखील संयम ठेवा, असे सांगितले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना याबाबत विनंती करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

कुणबी नोंदी असलेल्या लोकांना दाखले मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारने आरक्षण दिले होते.

दुर्दैवाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ते टिकवता आले नाही, असा टोला मंत्री महाजन यांनी लगावला.

नाशिकचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत विचारले असता, मंत्री महाजन म्हणाले, की माझ्यावर काही कारण नसताना मोक्का लावण्यात आला होता, हे सर्वांना ज्ञात आहे. मात्र जे गंभीर गुन्हे आहेत त्याबाबत कारवाई होणे अपेक्षित आहे. जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. जे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver New Rule: चांदीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आयात शुल्क वाढीनंतर आता नवा नियम लागू; किमती वाढणार?

पुण्यात २५ वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन, अधिक मासात अंगठी, फ्लॅटसाठी ३ लाखाची मागणी; सासरच्यांवर गंभीर आरोप

'मी कधीच कुणाचं ऐकत नसते' प्राजक्ता माळीने PM मोदींचही न ऐकता आपलंच खर केलं, नक्की काय झालं?

Latest Marathi News Live Update : म्यानमार राष्ट्राध्यक्षांची मुंबई विमानतळाला भेट

Maharashtra Police: एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त, महाराष्ट्र पोलिसांचा दणका; २० कोटींचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT