NSK26H33410
जळगाव : रशियन एनर्जी वीकमध्ये सहभागी गिरीश पाटील.
......
रशियन एनर्जी वीकमध्ये
गिरीश पाटीलचे प्रतिनिधित्व
भारतीय शिष्टमंडळात युवा प्रतिनिधी म्हणून सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : मॉस्को येथे १२ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘रशियन एनर्जी वीक’मध्ये जळगाव जिल्ह्यातील वाघळूद येथील गिरीश पाटील यांनी भारतीय शिष्टमंडळातील युवा प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. ते युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) संस्थेचे संस्थापक असून, पर्यावरण व सार्वजनिक धोरणांचे अभ्यासक आहेत.
या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात विविध देशांतील ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि नेत्यांनी ऊर्जा, शाश्वत विकास व आंतरराष्ट्रीय सहकार्य या विषयांवर संवाद साधला. पाटील यांनी विविध चर्चासत्रांमध्ये सहभाग घेत शाश्वत ऊर्जा साधनांबाबत आपली भूमिका मांडली. तसेच, कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासह रशियाचा इतिहास व संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या उपक्रमांमध्येही ते सहभागी झाले. पाटील यांनी मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून जलधोरण विषयात सुवर्णपदकासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ते जलसंधारण, नदी पुनरुज्जीवन, हवामान शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी युनिसेफचे राष्ट्रीय युवा सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.