नाशिक

‘गिरणा’च्या पाण्यामुळे ‘रब्बी’ला मिळणार दिलासा

CD
‘गिरणा’च्या पाण्यामुळे ‘रब्बी’ला मिळणार दिलासा खानदेशात पेरण्या स्थिर राहण्याचा अंदाज; २१ हजार हेक्टरवर पेरणी क्षेत्र सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : खानदेशात सर्वात मोठ्या गिरणा धरणातील जलपातळी यंदा १०० टक्के असून, यंदा धरणातून रब्बीसाठी पाणी मिळणार आहे. दुसरीकडे प्रमुख मध्यम, लघु प्रकल्पदेखील भरले आहेत. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचा पेरा गिरणा पट्ट्यात स्थिर राहणार आहे. गिरणा नदीवरील गिरणा धरण खानदेशातील सर्वात मोठे धरण आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु त्याचा सर्वाधिक लाभ जळगावातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आदी भागास आहे. नाशिकमधील मालेगाव शहर, नांदगाव शहर आणि मालेगावातील उद्योगांना या धरणातून पाणी दिले जाते. तसेच जळगावातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरांसह १२० गावांच्या पाणी योजना गिरणा धरणावर अवलंबून आहेत. या धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. यंदाही गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. गिरणा पट्ट्यातील २१ हजार हेक्टरवर रब्बी हंगामास लाभ मिळत आहे. या धरणात जलसाठा मुबलक असल्याने पाणी योजनांनादेखील पाणी पुरेसे मिळणार आहे. गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव आदी भागांतील शेती क्षेत्र आहे. या भागातील लहान-मोठे तलाव, मध्यम प्रकल्पही भरले आहेत. मन्याड प्रकल्पात जलसाठा कमी आहे. पाचोऱ्यातील हिवरा व अग्नावती हे प्रकल्प मात्र भरले आहेत. तसेच बहुळा प्रकल्पातही जलसाठा मुबलक आहे. एरंडोलातील अंजनी आदी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे. बोरी व मन्याड प्रकल्प मागील वेळेस १०० टक्के होता. पाण्याचा वापर यंदाही अधिक आहे. काही भागात अडचणी यंदा पाऊस वेळेत नव्हता. अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने स्थिती काही तालुक्यांतील काही मंडळांत अडचणीची आहे. खरीपात मोठी पिकांची हानी झाली आहे. यामुळे रब्बीबाबत अपेक्षा आहे. एरंडोल, भडगाव, पारोळा, पाचोरा, चाळीसगाव भागात रब्बी पेरणी ८० टक्क्यांवर होईल, अशी अपेक्षा आहे. भाजीपाला, केळी पिकेही बऱ्यापैकी असतील, असे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT