नाशिक

नवरात्र चिंतन - ४

CD
पान दोन (फोटोसाठी जागा सोडणे) ---------------- नवरात्र चिंतन ४ कूष्मांडा : ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी नवरात्रातील चौथे रूप म्हणजे कूष्मांडा देवी. आपल्या मंद हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी म्हणून कूष्मांडेला ओळखले जाते. ‘अंड’ म्हणजे ब्रह्मांड. सृष्टीचे अस्तित्व नसताना भगवतीने मंद स्मितहास्य करीत ब्रह्मांडाची रचना केली, अशी पौराणिक संकल्पना आहे. त्यामुळे तिला सृष्टीचे आदिस्वरूप आणि आदिशक्ती म्हणून स्मरले जाते. कूष्मांडा देवीचे निवासस्थान सूर्यलोकाजवळ असल्याचे वर्णन आढळते. तिच्या शरीराची कांती आणि प्रभा सूर्यासमान तेजस्वी आहे. तिच्या तेजाची तुलना अन्य कशाशीही करता येत नाही, असे वर्णन केले जाते. भगवती कूष्मांडेच्या तेजाने आणि प्रकाशाने दाही दिशा प्रकाशित होतात. ब्रह्मांडातील वस्तू आणि प्राणिसृष्टीतील तेज तिच्यामुळे आहे, अशी श्रद्धा आहे. कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. तिच्या आठ हातांत कमंडलू, धनुष्य-बाण, कमलपुष्प, अमृतकलश, चक्र, गदा आणि जपमाळ अशी आयुधे व पूजावस्तू आहेत. तिची जपमाळ सर्व सिद्धी प्रदान करणारी मानली जाते. स्थिर मनाने आणि एकाग्रतेने भगवती कूष्मांडेची उपासना केल्यास भक्तांचे रोग, शोक आणि दुःख दूर होतात, तसेच आयुष्य, आरोग्य, यश आणि बळ प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. सहज सेवा, भक्ती आणि शरणागत भाव यांच्या माध्यमातून साधकाला परमपदाची प्राप्ती होऊ शकते. योगसाधनेत या दिवशी साधकाचे मन अनाहतचक्रावर स्थिर करण्याचा विचार केला जातो. कूष्मांडा देवीची उपासना भवसागरातून पार होण्याचा मार्ग सुलभ करणारी मानली जाते. भगवती कूष्मांडेला वंदन करताना म्हणूया, सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥ - लक्ष्मीकांत म. जोशी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

Water Supply : टंचाईग्रस्त गावांत पाण्याची गुणवत्ता तपासणार; १८ हजार ६५० नागरिकांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी

Aadhaar Server Down : आधार सर्व्हर ठप्प, नवीन परिपत्रकाचा पेच; दुय्यम निबंधक कार्यालयांत दस्त नोंदणीचा खोळंबा!

राजेंद्र शिंदे उर्फ राजा खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर?

NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

SCROLL FOR NEXT