gold ring found in cow stomach esakal
नाशिक

आश्चर्यच! गायीच्या पोटातून निघालं सोनं? निफाड तालुक्यातील घटना

माणिक देसाई

निफाड (जि.नाशिक) : सूर्यकेतू नाडी सूर्याच्या संपर्कात आल्याने गोमाता सोन्याची निर्मिती करते, असे म्हटले जाते. मात्र जेव्हा गायीच्या पोटातून अनपेक्षितरीत्या सोन्याची अंगठी निघते, तेव्हा तिला ‘कामधेनू’ हाच शब्दप्रयोग लागू होतो. (Gold-ring-found-from-cow-stomach)

गायीच्या पोटातून निघालं सोनं?

हिंदू संस्कृतीत गायीला मातेची उपमा दिलेली आहे. गायीपासून दुग्धोत्पादन हा शेतकऱ्यांना अर्थिक मदत देणारा शाश्वत व्यवसाय आहे. केवळ आर्थिक प्राप्ती म्हणून नव्हे, तर एरवीदेखील शेतकरी जनावरांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागवतात. निफाड तालुक्यातील कोळगाव येथील प्रगतिशील शेतकरी विनायक वाघ यांची गाय चारा खात नाही, हे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी मंजूर येथील डॉ. सोनवणे यांना गायीला तपासणीसाठी बोलावले असता वैद्यकीय भाषेत, ‘फॉरेन बॉडी’ची म्हणजे पोटात काहीतरी गिळल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेची असल्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी संदर्भीय उपचारासाठी कोळपेवाडी येथील डॉ. सुशील कोळपे यांना बोलावले. तीन महिन्यांपूर्वी वाघ यांच्या पत्नीची घास कापताना एक तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली होती, ती शोधूनही सापडली नाही. शस्त्रक्रिया केल्यावर गायीच्या पोटातून ती अंगठी निघाली. ही अंगठी बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी गायीची तातडीने जागेवरच शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून बारीक खिळे, बारीक पत्रे निघाले. त्यामुळे गायीच्या आजारपणाच्या चिंतेत असणाऱ्या वाघ कुटुंबीयाने गाय बरी होण्याबरोबरच हरवलेले सोनेदेखील सापडल्याने समाधान व्यक्त केले. तसेच गायीचा जीव वाचविल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानले.

बऱ्याचदा जनावरांच्या पोटात चाऱ्यातून खिळे किंवा तत्सम वस्तू जातात. त्यामुळे जनावरांच्या आतड्यांना इजा होते. वैद्यकीय भाषेत त्याला ‘फॉरेन बॉडी’ असे म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची व जोखमीची असते. त्याचबरोबर तातडीने निर्णय घ्यावा लागतो. - डॉ. सुशील कोळपे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT