death esakal
नाशिक

Nashik News: बेरोजगारीच्या नैराश्‍यातून पदवीधर युवकाची आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पदवीधर युवकाला कुठेही नोकरी मिळत नसल्याने त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.

रोहीत संजय वाघ (२२, रा. आदित्य भवन, नासर्डी पुलाजवळ, द्वारका) असे या युवकाचे नाव असून, भाऊच आपला सांभाळ करीत असून त्यांना कोणतीही मदत करू शकत नसल्याचे शल्य त्यास बोचत होते.

यातूनच त्याने टोकाचा निर्णय घेतल्याने त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून समोर आले आहे. (Graduate youth commits suicide due to unemployment frustration Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रोहित याने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यामुळे तो नोकरीच्या शोधात होता. मात्र, प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याचा सांभाळ त्याचे भाऊच करीत होते. याच नैराश्‍यातून रोहित याने सोमवारी (ता. २६) रात्री राहत्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेतला.

सदरची बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, रोहित याने गळफास घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात नोकरी नाही, मी भावंडाना हातभार लावू शकलो नाही, असे लिहिले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT