नाशिक

डोंगरगावला मक्याला २३०१, तर सोयाबीनला ६६०० रुपये सरासरी भाव उपबाजारात मका, सोयाबीन लिलावाचा शुभारंभ,शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची सुविधा

CD
27169 डोंगरगाव : धान्याच्या लिलावाच्या प्रारंभी संभाजीराजे पवार, वसंत पवार, रतन बोरणारे, बाळासाहेब लोखंडे आदी. मक्याला २३०१ तर सोयाबीनला ६६०० रुपये भाव डोंगरगाव उपबाजारात लिलावास प्रारंभ, शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची सुविधा सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१४ : डोंगरगाव उपबाजारात मका व सोयाबीन लिलावास बुधवारी (ता.१४) प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शेतीमालाची चांगली आवक झाली. मक्याला सरासरी २३०१, तर सोयाबीनला ६६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. या उपबाजारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना जवळच शेतीमाल विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार यांनी दिली. डोंगरगाव उपबाजारात हंगामातील मका, सोयाबीन व भुसार धान्याच्या लिलावाचा शुभारंभ माजी सभापती संभाजीराजे पवार, बाजार समितीचे सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरनारे, माजी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशी मक्याला २ हजार ते दोन हजार ५००, तर सरासरी २ हजार ३०१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.सोयाबीनला ६ हजार ५०१ ते ६ हजार ७००, तर सरासरी ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मक्याची ६९७, तर सोयाबीनची ९४ क्विंटल आवक झाली. डोंगरगाव उपबाजारात सोमवार ते शुक्रवार असे आठवड्यातील पाच दिवस लिलाव सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचण्यास मदत होणार असून, शेतीमाल विक्रीनंतर रोख पैसे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांनी मका,सोयाबीन व अन्य भुसार धान्य स्वच्छ व वाळवून बाजार समितीत विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती वसंतराव पवार, उपसभापती रतन बोरनारे व सचिव के. आर. व्यापारे यांनी केले. याप्रसंगी संचालक किसनराव धनगे, कांतिलाल साळवे, भास्कर कोंढरे, बापूसाहेब गायकवाड, अल्केश कासलीवाल, भरत समदडीया, डोंगरगाव सोसायटी अध्यक्ष दत्तात्रेय सोमासे, बाबूराव सोमासे, उत्तमआबा सोमासे,व्यापारी अंबादास नळे, सीताराम पगारे, समाधान सोमासे, जगन सोमासे, महेश सोमवंशी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यात थरारक गोळीबार; डोक्यात २ गोळ्या झाडून हरीश गजवानींची निर्घृण हत्या!

Ladakh Development Boost : लडाखला ३,३५० कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लेह विमानतळासह सामरिक रस्त्याचे लोकार्पण

Strait of Hormuz: मोठी दुर्घटना! 'होर्मुज'मध्ये अडीच हजार कंटेनर्स बुडाले; मालवाहू जहाज धडकलं, सप्लाय चेनवर होणार परिणाम...

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

IND vs WI, 4th T20I: शे होपची बॅट पुन्हा तळपली, ठोकलं ५० चेंडूत शतक; भारताला विजयासाठी पार करावं लागणार विक्रमी टार्गेट

SCROLL FOR NEXT