NAMCO Bank esakal
नाशिक

NAMCO Bank News : नाशिक मर्चंट बँकेला 66 कोटींचा ढोबळ नफा! महिनाभरात 184 कोटींच्या ठेवींची वाढ

Nashik News : नाशिक मर्चंट बँकेने मार्चअखेर ६६ कोटी ९५ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे. सर्व आवश्यक तरतुदी वजा करून ४१.२३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक मर्चंट बँकेने मार्चअखेर ६६ कोटी ९५ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविला आहे. सर्व आवश्यक तरतुदी वजा करून ४१.२३ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये गत महिनाभरात तब्बल १८४ कोटींनी वाढ झाली असून एकूण २१८४ कोटींवर पोचल्या आहेत अशी माहिती नामको बँकेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, उपाध्यक्ष रंजन ठाकरे, जनसंपर्क संचालक अशोक सोनजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. बँकेच्या सभासदांना यंदा १५ टक्के इतका लाभांश देण्याचा मानस असल्याचेही भंडारी यांनी यावेळी सांगितले. (Gross profit of 66 crore to Nashik NAMCO Bank news)

बँकेने यंदा एकत्रित व्यवसाय ३२२३.९८ कोटींवर नेऊन ठेवला आहे. यंदाच्या वर्षात बँकेने १०३९ कोटींचे कर्जवाटप केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ९७ कोटीने कर्जवाटप वाढले आहे. बँकेची गुंतवणुक १४४८.६५ कोटी इतकी आहे. राखीव निधीत गतवर्षीच्या तुलनेत वाढ होऊन ३९५.५० कोटी निधी जमा आहे.

२९४.९१ कोटींपैकी ९५.३६ कोटींची वसुली झाली आहे. बँकेचा ढोबळ एनपीए ५.९० टक्के असून निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. इंडिया रेटिंग या रिझर्व्ह बँकेच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून बँकेने रेटिंग करून घेतले असून सदर संस्थेने (लॉन्ग टर्म स्टेबल) ग्रेड दिलेली आहे.   (latest marathi news)

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधेसाठी बँकेने विना तारण ५० लाख रुपयांची कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती भंडारी यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेस संचालक वसंत गिते, हेमंत धात्रक, प्रफुल्ल संचेती, विजय साने, ललित मोदी, प्रकाश दायमा, उल्हास सातभाई,अविनाश गोठी, नरेंद्र पवार, आकाश छाजेड, प्रशांत दिवे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्राम दीक्षित आदी उपस्थित होते.

दुरावलेले ग्राहक यांना आकर्षित करण्यासाठी बँकेने ग्राहकांना ८.५ टक्के वेलकम रेट देऊ केला आहे. महिला उद्योजकांना ३५ टक्के व पुरुष उद्योजकांना २५ टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे. तसेच बँकेने कर्जदाराला विना जामीनदार कर्ज उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात अशा प्रकारे कर्ज देणारी नामको बँक पहिली बँक ठरणार असल्याचा दावा अध्यक्ष भंडारी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : प्रियांका गांधी वाड्रा दिल्लीतील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचल्या

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT