Gurumauli Annasaheb More guidance Opportunity to serve Lord Vishnu in Purushottam month nashik news esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : पुरुषोत्तम मासात भगवान विष्णू सेवेची संधी : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

Gurumauli Annasaheb More : मंगळवार (ता. १८)पासून अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. या महिन्यात भगवान विष्णूची अधिकाधिक सेवा करून पुण्यसंचय करण्याची संधी सर्व भाविक, सेवेकऱ्यांना लाभणार असल्याने या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आज त्र्यंबकेश्‍वर गुरुपीठात केले.

श्री स्वामी समर्थ गुरुपीठात दर शनिवारप्रमाणे श्री गुरुचरित्रासाठी उपस्थित भाविक व सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाउली यांनी हे आवाहन केले. (Gurumauli Annasaheb More guidance Opportunity to serve Lord Vishnu in Purushottam month nashik news)

या अधिक मासात आपण सात दिवसांचे भागवत पारायण करतो; परंतु ज्या भाविकांना रोज महिनाभर पारायण करायचं आहे, त्यांनी ७०० श्लोकी भागवत वाचावं, अशी सूचनाही त्यांनी केली.

उपस्थित सेवेकऱ्यांशी गुरुमाउलींनी अनेक विषयांवर हितगूज केले. सेवामार्गाचा व्याप प्रचंड वेगाने वाढत असल्याने सक्रिय, मार्गदर्शक सेवेकऱ्यांची आज नितांत गरज आहे. विशेषतः जे विविध कामांतून, नोकरीतून, कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाले आहेत, अशा जबाबदार, अनुभवी लोकांनी सेवामार्गाच्या कामात पुढे यावे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आज हजारो केंद्रे आहेत. या समर्थ केंद्राचा सांभाळ करण्यासाठी आणि येथे येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा अनुभवी लोकांची गरज आहे. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, या उक्तीनुसार सर्व समाज शहाणा, ज्ञानी, सुसंस्कृत, जबाबदार, निर्व्यसनी, शाकाहारी, राष्ट्रप्रेमी घडविण्यासाठी या अनुभवी लोकांनी सेवाकार्यात झोकून द्यावे.

प्रत्येक केंद्राच्या परिसरात असलेल्या अशा अनुभवी, निवृत्त लोकांचा शोध घेऊन त्यांची गुरुपीठकडे नोंद करावी म्हणजे त्यांना जबाबदारी देता येईल, असे गुरुमाउलींनी सूचित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT