नाशिक

हातपंप दुरुस्तीची मागणी

CD
NGL26B04111 चिमठाणे : हातपंप दुरुस्ती व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या मागणीचे मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांना निवेदन देताना विरेंद्रसिंग गिरासे. ---------- चिमठाणे परिसरातील हातपंप तत्काळ सुरू करावे विरेंद्रसिंग गिरासे यांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा निमगूळ, ता. १५ : चिमठाणे जि. प. गटासह परिसरातील गावांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर चिमठाणे परिसरातील बंद अवस्थेतील हातपंप तातडीने सुरू करावेत, तसेच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, अशी मागणी माजी जि. प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांनी पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिमठाणे जिल्हा परिषद गट व परिसरात मोठ्या प्रमाणावर खडकाळ जमीन आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आतापासूनच जाणवू लागली आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये पूर्वीपासून असलेले हातपंप सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणा व ग्रामपंचायतींना बंद असलेल्या हातपंपांची दुरुस्ती करून ते तातडीने सुरू करण्याचे आदेश द्यावेत, तसेच परिसरात शेळी- मेंढीपालन, गाय- म्हशींचा दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील मोक्याच्या ठिकाणी पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, याबाबत संबंधित यंत्रणा व ग्रामपंचायतींना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

IND vs WI : अर्शदीप सिंग पाचव्या T20I मधून बाहेर गेला, तर त्याची जागा कोण घेणार; ३६ वर्षीय गोलंदाजाच्या कमबॅकची तुफान चर्चा

Latest Marathi News Update: ‘मकोका’तील फरार आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Neha Bora: 'सीजेपी'च्या पत्रकार परिषदेत गोंधळ अन् घोषणाबाजी; आंदोलनाची पुढची दिशा केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT