नाशिक

डेंगीचा प्रादुर्भाव, वाहने धुळखात

CD
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो-NSK26H33204 धुळे : महापालिकेने नव्याने खरेदी केलेल्या व उपयोगाशिवाय धुळखात उभी असलेली फवारणीची वाहने दाखवितांना धीरज पाटील. --- डेंगीचा, मलेरियाचा प्रादुर्भाव; वाहने मात्र धुळखात! --- शिवसेना (उबाठा); धुळेकरांच्या आरोग्याशी मनपाला सोयरसुतक नसल्याचा आरोप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २१ : शहरात सध्या डेंगी, मलेरिया साथीचा प्रादुर्भाव वाढला असून, शहरातील हॉस्पिटल या आजाराच्या रुग्णांनी गजबजून गेलेली असताना धुळे महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. धुळेकरांच्या आरोग्याशी त्यांना कुठल्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. धुळे महानगरपालिका माध्यमातून गेल्या दोन महिन्यापूर्वी धुरळणी, फवारणी साठी नव्यानेच वाहने खरेदी केली. मात्र, वाहनचालकांच्या अभावी ही वाहने धुळखात पडलेली आहेत. या वाहनांवर धूळ जमा झाली असून, मंगळवारी (ता. २०) दसऱ्याच्या मुहूर्तावर या वाहनांवरील धूळ स्वच्छ करत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांचे पूजन देखील केले. मात्र, धुळे शहरातील ठराविकच भागात डासांचा प्रादुर्भाव रोखण्याकरता फॉगिंग मशीन उपलब्ध होत असून, शहरातील कॉलनी परिसरातही फॉगिंग यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झालेले नाही. डासांचा प्रादुर्भाव याच परिसरात जास्त असून, अनेक रुग्ण देखील कॉलनी परिसरातीलच आढळून आलेले आहेत, असे शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांवर टिका धुळे महापालिकेने गेल्या दोन महिन्यापूर्वी कंत्राटी पद्धतीवर अनेक कामगारांची भरती केलेली असताना या भरतीत अनेकांनी दबाव आणून आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना भरती करून घेतले. मात्र, धुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सांभाळण्याकरता वाहनचालकांची देखील महापालिकेला गरज भासेल हे सत्ताधारी विसरले. त्यामुळे आज लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ही वाहने धुळखात पडलेली आढळून आली आहेत, अशी टिका शिवसेना (उबाठा) पक्षाने केली आहे. अन्यथा पर्दाफाश या संदर्भात शिवसेना (उबाठा) महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी स्वतः जुन्या महापालिकेच्या आवारात असलेल्या वाहनांची पाहणी केली. खरेदी केल्यानंतर ही वाहने वापरण्यात आलीच नसल्याचे आढळून आल्याने पक्षातर्फे त्यांनी सत्ताधारी भाजप व मनपा आरोग्य विभागाचा तीव्र शब्दात निषेध केला. येत्या आठवडाभरात संपूर्ण धुळे शहरातील कॉलनी परिसर, गजबजलेला भागात धुरळणी, फवारणी न झाल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केला जाईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख श्री. पाटील, तेजस गोटे यांच्यासह इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

Das, Ranka News: CJP च्या सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; तब्बल ७ दिवस तिहारमध्ये राहिल्यानंतर...

Uday Samant : एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांची चौकशी व्हावी

Latest Marathi News Live Update : शिळे अन्न खाल्याने तेरा जणांना विषबाधा; तिघांवर उपचार सुरू

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

SCROLL FOR NEXT