A team of traffic police during a special drive against drunken and helmetless two-wheeler drivers. esakal
नाशिक

Helmet Special Drive : सावधान.. 2042 विना हेल्मेट चालकांवर दडुंका! वाहतूक पोलिस अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

Helmet Special Drive : मद्य प्राशन करून तसेच, विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

वाहतूक शाखा युनिट तीनच्या वतीने मागील पंधरा दिवसात मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या अठरा वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच, दोन हजार ०४२ विना हेल्मेट चालकांवर दंडात्मक कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Helmet Special Drive action on 2042 drivers without helmet Traffic police alert Nashik)

मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो तसेच, दहा हजार रुपये दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकते.

दुसऱ्यांदा मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे आढळून आल्यास पंधरा हजार रुपये दंड किंवा एक वर्ष तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

मद्य प्राशन करून, विना हेल्मेट वाहन चालविल्यामुळे गंभीर व प्राणांकीत अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी सिडकोत विशेष मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसांपासून विविध चौकांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मद्य प्राशन करून बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांकडून आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात घालून बेजबाबदारपणे वाहन चालवले जातात अशा चालकांविरुद्ध वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग नाशिक यांच्यावतीने विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.

मद्य प्राशन न करता व इतर वाहतूक नियमाचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सदरची कारवाई वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सीताराम गायकवाड, वसंत मोरे, वाहतूक विभाग युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पराग जाधव, पोलिस उपनिरीक्षक भामरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुक्तार पठाण, श्री. सातपुते, श्री. जाधव, श्री. चित्ते, श्री. परदेशी, श्री. घागरे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT