Home Guard News esakal
नाशिक

Nashik News : होमगार्डना मिळणार 3 महिने तुरुंगात काम; महाराष्ट्रातल्या 252 जणांना तूर्तास लाभ

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : राज्यात ज्या ठिकाणी कारागृह आहे अशा ठिकाणी २५२ होमगार्डला कारागृहात फेब्रुवारी २०२३ पर्यंत रोजगार मिळणार आहे. त्यामुळे होमगार्ड संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे होमगार्ड बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Home guards to get 3 months of jail work 252 people in Maharashtra currently benefited nashik Latest Marathi News)

राज्यातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला, पंढरपूर, भंडारा, वाशीम, बुलडाणा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, परभणी, नाशिक या ठिकाणच्या कारागृहांमध्ये २४८ पुरुष आणि चरा महिला अशा २५२ लोकांना महाराष्ट्रात रोजगार मिळणार आहे. यामुळे कारागृह विभागात असणारी कर्मचाऱ्यांची संख्या काही दिवस तरी भरून निघणार आहे.

होमगार्ड संघटनेने मागणी केल्यानुसार कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाच्या शाळा, महाविद्यालयांबरोबरच सरकारी आस्थापनांच्या सुरक्षाकरिता होमगार्डची नियुक्ती शासन विविध स्तरावर करीत आहे. सध्या कारागृह विभागात होमगार्डला काम करण्याची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यातून होमगार्ड बांधवांना संरक्षणाचे धडेही मिळणार आहेत. संशोधन आणि विकास या तत्त्वावर हा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे होमगार्ड संघटनेने ‘सकाळ’चे बोलताना सांगितले आहे.

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

कारागृहात होमगार्डला काम करण्याचा एक अनुभव मिळणार आहे. शासनाने परिपत्रक काढून ठिकठिकाणच्या कारागृहात कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नेमणूक करावयाचे मनुष्यबळ याचा तक्ता प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या २५२ होमगार्ड बांधवांना रोजगार मिळणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. यातून होमगार्ड बांधवांना फेब्रुवारी २०२३ पर्यंत मानधन मिळणार असून, तीन महिने सेवा करण्याची शासन संधी देत आहेत.

"शासनाचे आभार मानतो. कारागृहात काम करण्याचा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळणार आहे. या माध्यमातून मानधन आणि रोजगारही तीन महिने मिळणार आहे. कायमस्वरूपी बारा महिने रोजगार मिळावा, यासाठी आम्ही अनेकदा मागणी केली आहे, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असल्याचा आनंद असून, होमगार्ड बांधवांना दिलासा मिळाला आहे."

- नितीन गुणवंत, अध्यक्ष, जिल्हा होमगार्ड संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT