Leopard Attack esakal
नाशिक

Nashik News : सिन्नरला बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचे शिंगरू ठार

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे तील गुळवंच शिवारात असलेल्या दगडवाडीत शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक वर्ष घोड्याचे शिंगरू मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

दौलत बाबुराव गुरकुले यांची दगडवाडी शिवारात नाल्यालगत शेती आहे. शेतात चरण्यासाठी त्यांनी घरापासून काही अंतरावर एक वर्ष वयाचे घोड्याचे शिंगरू बांधलेले होते. रात्री दहा वाजेच्या सुमारास स्थानिक शेतकरी सोपान गुरुकुले हे त्यांच्या विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेजारच्या शेतात शिंगरू जखमी अवस्थेत असल्याचे दिसले. (Horse colt killed in leopard attack at Sinnar Nashik News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

त्यांनी लागलीच आरडाओरड करत दौलत गुरुकुले यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांना सुचित केले. शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिंगराचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून मादी बिबट्या सह बछड्यांचा वावर आहे या बिबट्यांकडून पाळीव प्राणी व माणसांवरही हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत.

आजच्या घटनेत श्री. गुरुकुले यांचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. वनविभागाने रतन इंडिया सेझ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी ठेवलेला पिंजरा काही दिवसांपूर्वी खंबाळे शिवारात हलवला आहे. गुळवंच भागात कायमस्वरूपी पिंजरा ठेवावा अशी मागणी भाऊलाल शिरसाट यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT