फोटो : H33461
नाशिक : उद्यानविद्या रोपवाटिका प्रशिक्षण शिबीरात सहभागी तरुण.
--
मुक्त विद्यापीठात उद्यानविद्या
रोपवाटिका प्रशिक्षण शिबिर
नाशिक, ता. २४ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा – ॲग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ दिवसीय ‘उद्यानविद्या रोपवाटिका’ प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरात नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ३८ होतकरू युवक – युवती व महिला सहभागी झाल्या.
शिबिर समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नाशिकचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद उपस्थित होते. व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, उद्यानविद्या विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत, विषय विशेषज्ञ राजाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलताना मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले, की अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक विकासाला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी माया शिंदे, कृष्णा बिडगर, संपत महाले, किरण डावखर, सचिन चव्हाण या सहभागींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशिक्षण सहयोगी डॉ. प्रकाश कदम यांनी केले. यशस्वितेसाठी शरद माळी, संदीप दळवी, हृषीकेश पवार व हर्षल काळे यांनी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.