Crime esakal
नाशिक

Nashik Crime: घरगुती भांडणाच्या रागातून पतीचा पत्नी अन तिच्या नातेवाईकांवर हल्ला; स्वत: लाही संपवण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

ओझर : नवरात्रोत्सव कार्यक्रमातून घरी जात असलेल्या पत्नीच्या पाठीमागुन आलेल्या तिच्या पतीने मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हटले असता पत्नीने बोलण्यास नकार देताच घरगुती भांडणाच्या रागातून तिच्या पतीने पत्नीसह तिच्या दोन चुलत बहिनी, व तिची चुलती यांना चाकूने मारून गंभीर जखमी केले व स्वताच्या छातीवर चाकू मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना ओझर शिवारात घडली. (Husband attacks wife and her relatives out of anger over domestic dispute Try to kill himself at ozar Nashik Crime)

शुभम शिवाजी गोतरणे राहाणार जऊळके ता.दिंडोरी याचे व त्याच्या पत्नीचे घरगुती कारणावरुन भांडण चालु असुन गुरुवार दिनांक 19 रोजी रात्री साडे दहावाजेच्या सुमारास शुभम गोतरणे याची पत्नी (वय 21) तिच्या दोन चुलत बहिनी व चुलती राहाणार चौधरी नगर ओझर यांचेसोबत नवरात्र उत्सव निमात्ताने असलेल्या कार्यक्रमावरून ओझर शिवारातील चौरे मळा रस्त्याने घरी परत येत असतांना पाठीमागुन आलेल्या शुभम गोतरणे याने पत्नीस शिवीगाळ करून "मला तुझ्याशी बोलायचे आहे" असे म्हणाला,

तेव्हा त्याच्याबरोबर पत्नीने बोलण्यास नकार दिल्याने शुभम गोतरणे याने घरगुती कारणाचा राग मनात धरून त्याचे हातातील चाकुने पत्नीच्या पाठीवर मारून गंभीर दुखापती केले.

तसेच सदरचे भांडण सोडविण्यास आलेली त्याच्या पत्नीची चुलती हीस पोटात व चाकुने मारुन गंभीर दुखापत केली. त्याच वेळी तेथे असलेल्या तिच्या दोन चुलत बहिणींना देखील चाकुने मारुन दुखापती केल्या.

तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करून शुभम याने त्याचे हातात असलेल्या चाकुने त्याचे स्वतःचे छातीस मारुन दुखापत करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार शुभम गोतरणे याच्या पत्नीने नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी शुभम गोतरणे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक तपास पोलिस निरिक्षक दुर्गेश तिवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र कोल्हे हे करीत आहेत. दरम्यान जखमी शुभमला आडगांव रूग्णालयात व इतर चौघी जखमीना ओझर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT