नाशिक

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला सक्तमजुरी

CD
विवाहिता आत्महत्येप्रकरणी पतीला सक्तमजुरी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : सासू-सासऱ्यांची निर्दोष मुक्तता सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१३ : चारचाकी खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा आणि चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रदीप दिलीप गाजरे (वय २६, रा. आदर्शनगर, रामवाडी, पंचवटी) असे दोषी पतीचे नाव असून, पुराव्याअभावी सासू-सासऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. गाजरे याने १७ डिसेंबर २०२३ ते ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पत्नी पूनम हिच्याकडे चारचाकी खरेदीसाठी माहेरून पैसे आणण्याची वारंवार मागणी केली. पैसे न आणल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला वायरने मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून पूनम हिने राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी तिची आई आशा क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. एन. सोनवणे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. व्ही. कथारे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. साक्षीदार, पंच आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने गाजरे याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. व्ही. व्यवहारे आणि आर. व्ही. गायकवाड यांनी काम पाहिले. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पैरवी हवालदार सुधाकर गायकवाड आणि हवालदार सोमनाथ गावित यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT