नाशिक

कायदे जनजागृती शिबिर

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 33338 वारूड (ता. शिंदखेडा): कायदेविषयक साक्षरता व बालहक्क संरक्षण जनजागृती कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना आदर्श महिला पुरस्कार देऊन गौरविताना न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी. शेजारी डॉ. शिवाजी पाटील, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, आदी. -- वारूड येथे बालहक्क, कायदे जनजागृती शिबिर -- दहा महिलांना आदर्श महिला पुरस्कार; नरेश भदाणे यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : जळगावस्थित कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि येथील वेस्ट खानदेश दलित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वारूड (ता. शिंदखेडा) येथे एक दिवसीय ‘कायदेविषयक साक्षरता व बालहक्क संरक्षण’ जनजागृती कार्यक्रम महादेव मंदिर चौकात पार पडला. - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शिवाजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय बहिरम, मुख्य लोकाभिरक्षक ॲड. ज्ञानेश्वर महाजन, प्रा. दगा पाटील, ॲड. नरेश भदाणे, अनिकेत शिरसाठ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल दहा महिलांना आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, विधी शिक्षणात विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल गावातील ॲड. नरेश भदाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी म्हणाले, न्याय मागणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. अन्याय सहन न करता कायदेशीर मार्गाने न्यायालयात यावे आणि आपसातील वाद सामंजस्याने सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शिवाजी पाटील यांनी विद्यापीठाचा ज्ञानाचा झरा गावागावांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. तर मुख्य लोकाभिरक्षक ॲड. ज्ञानेश्वर महाजन यांनी प्राधिकरणाच्या मोफत कायदेविषयक मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. विजय बहिरम, प्रा. दगा पाटील, ॲड. नरेश भदाणे, अनिकेत शिरसाठ यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. - आदर्श महिला पुरस्कारार्थी यावेळी लोकनियुक्त सरपंच शोभाबाई बोरसे, शेतमजूर विठाबाई बेहेरे, आशा कर्मचारी छायाबाई भदाणे, आशा कर्मचारी भारती चौधरी, ग्रामपंचायत सदस्य मालूबाई बिराडी, निवृत्त सफाई कर्मचारी मंजोराबाई आखाडे, शेतकरी व शेतमजूर उज्वलाबाई बेहेरे, निवृत्त अंगणवाडी शिक्षिका सिंधुबाई पाटील, माजी स्वातंत्र्यसैनिक अब्दुल पटवे यांच्या सून रईसा पटवे आणि स्वाध्याय परिवार प्रतिनिधी मनीषा कोतकर यांचा गौरव करण्यात आला. प्रा. अनिल दाभाडे व डॉ. वैभव सबनीस यांच्या मार्गदर्शनात संयोजन झाले. तंटामुक्ती अध्यक्ष तथा माजी सरपंच भालेराव बेहेरे, उपसरपंच अनिल महाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

जमिनीवर बसला, वरपून कोळंबीचं कालवण खाल्लं! स्मिता यांनी सांगितला रणबीर कपूरचा तो किस्सा, म्हणाल्या- तो इतका...

SCROLL FOR NEXT