धुळे ः टुडे १ साठी
---
फोटो क्रमांक ः 31928
धुळे : पोलिसांनी जप्त केलेला मद्यसाठा.
--
बनावट दारूचा कारखाना उघड
-
धुळे जलसिंचन सोसायटीत लाखाचा मुद्देमाल जप्त
-
सकळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : शहरातील साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयामागील जलसिंचन सोसायटीत सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता. ९) रात्री छापा टाकला. या कारवाईत टँगोपंचच्या एक हजार ६०० बाटल्यांसह स्पिरीट, स्टिकर, बूच आणि सील पॅक करण्याचे मशीन, असा एकूण एक लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संशयित मयूर नारायण खैरनार (वय ३६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. साक्री रोडवरील सुरत बायपास महामार्गालगतच्या जलसिंचन सोसायटीतील एका प्लॉटमध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली. जप्त मुद्देमालात ६४ हजार रुपये किमतीच्या टँगोपंचच्या बाटल्या आणि ३५ हजार रुपयांचे स्पिरीट यांचा समावेश आहे. विभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पल्लवी टर्ले, योगेश धोंगडे आणि आर. टी. राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.