Mother's Day Special
Mother's Day Special  esakal
नाशिक

Mothers Day Special : 10 वर्षांत 14 हजार मातांनी दिला गोंडस बाळांना जन्म; ‘एसएमबीटी’मध्ये मोफत सुविधा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मेमधील दुसरा रविवार (ता. १४) मातृदिन सर्वदूर साजरा केला जातो. (In 10 years in 14 thousand mother gave birth to baby in SMBT hospital nashik news)

एसएमबीटी रुग्णालयात गेल्या दहा वर्षात चौदा हजारांहून अधिक गरोदर मातांना गोंडस बाळांना जन्म दिला असून मातांसाठी कृतज्ञता, प्रेम, कौतुक करण्यात आले. रुग्णालयात ‘सिजेरीयन' शस्त्रक्रिया आणि ‘नॉर्मल डिलिव्हरी' पूर्णपणे मोफत करण्यात आली.

उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या चॅरिटेबल रुग्णालयापैकी एसएमबीटीमध्ये अनेक आजारांवर सरकारी योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. तसेच जे आजार योजनेत बसत नाहीत, अशा आजारांवर अगदी नाममात्र दरात उपचार होत आहेत.

गरोदर मातांशी संलग्न असलेल्या सोनोग्राफी व रक्त तपासणीच्या सर्व चाचण्या मोफत केल्या जात आहेत. कोरोना प्रार्दुभावाच्या काळात एसबीटीमध्ये अधिक प्रसूती झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अनेक मातांना कोरोना संसर्ग झालेला असताना त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कोरोना संसर्ग झालेल्या महिलांच्या उपचारासाठी विशेष कोरोना दक्षता विभाग उभारण्यात आला होता.

त्यात अनेक महिलांवर मोफत उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अमित नाईक म्हणाले, की रुग्णालयात २४ तास अनुभवी स्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. गर्भसंस्कार याठिकाणी केले जातात. अतिशय अवघड परिस्थितीत आलेला रुग्ण इथे येऊन बरा झाला आहे. त्यामुळे इथल्या अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ रुग्णांनी घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT