MLA Devyani pharande Google
नाशिक

रास्ता रोकोप्रकरणी आमदार फरांदेसह २४ जणांविरूद्ध गुन्हे

विनोद बेदरकर

नाशिक : ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य शासनाने प्रभावीपणे बाजू मांडली नाही, याचा निषेध करीत भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार देवयानी फरांदे यांच्यासह चोवीस जणाविरोधात शनिवारी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (in OBC reservation agitation case registered against 24 persons including MLA pharande)


आमदार देवयानी फरांदे, सुनील रघुनाथ केदार, भाजप ओबीसी सेलचे सतीश रत्नपारखी, मंगेश रोजेकर, अविनाश साहेबराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे शहराध्यक्ष शिरीष पालवे, जगन अण्णा पाटील, दिलीप अजिंक्य साने, राजेंद्र महाले, श्रीकृष्ण दौलत तांगडे, मच्छिंद्र बाळासाहेब सानप, मिलिदं मधुकर भालेराव, दत्ता निंबा शिंदे, मनीषा रत्नाकर पवार, नंदकुमार कृष्णदास देसाई, चंद्रकांत विष्णू थोरात, रेखा सतीन वाजपेयी, सरिता श्रीधर सोनोने, अच्युत धनशाम बांदेकर, योगेश रामराव हिरे, कविता देवानंद तेजाळे, योगेश बापू मोरे, चंद्रकांत कारभारी खोडे, राजेंद्र बाळकृष्ण मोरे आदींनी शनिवारी (ता.२६) जूनला विल्होळी जकात नाका येथे मुंबई आग्रा महामार्गावर इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने ओबीसीचे आरक्षण रद्द झाल्याने राज्य शासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले. कोरोना महामारीत सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याचा नियम असतांना गर्दी जमवून वाहनांना अडथळा आणला म्हणून शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT