Nashik Monsoon Update News esakal
नाशिक

संततधार पावसाने जनजीवन विस्कळित; ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गेल्या ४८ तासांपासून संततधार पावसाने (rain) शहराला झोडपून काढले. सहलीनिमित्त शहराबाहेर पडणाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या (traffic) समस्येला सामोरे जावे लागले. तर, गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढल्याने शहरातील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. एकूणच, संततधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाल्याचे दिसून आले. (Incessant rains disrupt public life Nashik Latest Monsoon News)

तब्बल सव्वा महिन्याच्या विलंबाने नाशिकमध्ये पावसाने शनिवार (ता.९) पासून हजेरी लावली. तर, रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने शहरातील नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले. परिणामी, गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या संततधारेमुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली. अनेक ठिकाणी रस्ते उखडल्याने जागोजागी खडे पडले आहेत.

बहुतांशी सिग्नलच्या ठिकाणी रस्ते जलमय होऊन खड्डे पडले. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. काही ठिकाणचे सिग्नल यंत्रणा पावसामुळे कोलमडून पडली. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्यवर्ती भागातील व्यावसायिकांची पावसामुळे तारांबळ उडाली. गोदावरी नदीवरील होळकर पुलावर पुराचे पाणी पाहण्यासाठी नाशिककर गर्दी करतात.

या वेळी मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी गर्दी होत असते. यातून यापूर्वी दुर्घटना घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी पंचवटी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात केला होता. कोणालाही पुलाच्या कठड्यावर येण्यास मनाई केली जात होती. त्याचप्रमाणे, नदीवरील दहिपूल, गाडगे महाराज पूल या ठिकाणीही पोलिस तैनात होते. दहिपूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला होता. दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून दक्षतेच्या सूचना दिल्या जात होत्या.

ट्रॅफिक सिग्नलवर पोलिस

गेल्या दोन दिवसात पावसामुळे वाहतूक यंत्रणा कोलमडल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती. सोमवार (ता.११) मात्र वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलिसांची उपस्थिती दिसून आली. सिग्नल यंत्रणा सुरू असूनही पावसामुळे वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक पोलिसांकडून ती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT