nashik municipal corporation esakal
नाशिक

महापालिका निवडणूक : अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता

विक्रांत मते

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने एकसदस्य वॉर्डरचनेचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, राजकीय पक्षांच्या मनात मात्र धस्स झाले आहे. एकसदस्यीय वॉर्डरचनेत अपक्ष नगरसेवक अधिक निवडून येणार असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात जोड-तोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने एक सदस्य वॉर्डरचनेनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या असल्या, तरी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात द्विसदस्यीय प्रभाग रचनेची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होत आहेत. यापूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बहुसदस्य प्रभागपद्धती रद्द करून सदस्य प्रभागरचना अस्तित्वात आणण्याचा निर्णय डिसेंबर २०१९ मध्ये घेतला होता. त्यासाठी विधिमंडळात कायदा केला. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन सदस्य प्रभागाची मागणी पुढे आली होती. शिवसेनेला मुंबईत एक सदस्य प्रभाग, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये द्विसदस्यीय वॉर्डरचना हवी आहे. मात्र, पूर्ण राज्यात प्रभागरचनेचा निर्णय घेताना सर्वत्र एकच वॉर्डरचना असणे बंधनकारक आहे. वॉर्ड एक सदस्य की द्विसदस्यीय प्रभागरचना असावी, असा प्रश्न आतापर्यंत होता. मात्र, फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका घ्यायच्या असेल, तर त्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता निवडणूक आयोगाने एकसदस्य वॉर्डरचनेप्रमाणे कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता महापालिका पातळीवर तयारीला सुरवात झाली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार वॉर्डरचना

२०११ मध्ये नाशिक शहरात १४ लाख ९० हजार ५३ लोकसंख्या सर्वेक्षणाअंती घोषित केली होती. या आधारेच दहा ते १२ हजार लोकसंख्येची वॉर्डरचना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहरात १२२ एकसदस्यीय वॉर्डरचना अस्तित्वात येईल. ती तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. समितीत विभागीय अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ आदींचा समावेश आहे.

उत्तरेच्या दिशेने वॉर्डरचना

शहराची वॉर्डरचना उत्तरेचे दिशेने सुरू होणार आहे. उत्तरेकडून ईशान्य त्यानंतर पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे वॉर्डरचना होईल. दक्षिण भागाची वॉर्डरचना शेवटी केली जाईल. वॉर्डना क्रमांक देतानाही ते उत्तरेकडून दिले जाणार आहेत.

अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढणार

एकसदस्य वॉर्डरचनेत दोन ते अडीच हजार मतांची आवश्‍यकता लागणार आहे. त्यातून अपक्ष नगरसेवकांची मोठी संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपक्षांची संख्या वाढल्यास शहरांमध्ये नवीन आघाडी तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT