नाशिक

टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीला मुहूर्त

CD
टूडे साठी ---------- आयुक्त खत्री करणार इंदिरानगर टीडीआर घोटाळ्याची चौकशी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : इंदिरानगर येथील श्री राजसारथी सहकारी गृहनिर्माण संस्थे संदर्भातील टीडीआर घोटाळ्याची चौकशी महापालिका आयुक्त मनिषा खत्री स्वतः करणार आहे. शुक्रवारी (ता. १६) त्यांनी चौकशी समितीची बैठक बोलावली आहे. इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीच्या जागेतून डीपी रस्ता गेला असून, त्यासाठी महापालिकेने ८ हजार २११ चौरस मीटर क्षेत्र संपादित केले आहे. या मोबदल्यात संस्थेला १६ हजार ४२२ चौरस मीटरचा टीडीआर मिळाला होता. या टीडीआर विक्रीतून संस्थेला सुमारे १२ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु, सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता चेअरमन परशुराम निकम, सचिव देविसिंह देशमुख आणि काही संचालकांनी टीडीआरची परस्पर विक्री केल्याचा आरोप असून, गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण गाजत आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सदस्य किरण दराडे यांनी स्थायी समितीत केली होती. तसेच या प्रकरणात ढोमसे नावाच्या आमदाराचा कार्यकर्त्याची चौकशी होणार नसल्याचा दावा करत असून, थेट पालकमंत्री गिरीष महाजन यांचे नाव सांगत असल्याचा आरोपही दराडे यांनी सभागृहात केला होता. त्यानंतर सभापती मच्छिंद्र सानप यांनी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती जाहीर केली होती. या समितीत मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरुट आणि उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांचा समावेश होता. झगडे यांची बदली झाल्याने आता आयुक्त खत्री यांनी स्वतः चौकशीचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारच्या बैठकीसाठी नगररचना आणि भूसंपादन विभागाला संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यामागील सूत्रधार समोर येण्याची शक्यता आहे. ---------------

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; हल्लेखोर महिला दारुच्या नशेत, शिव्याही दिल्या

Pune Crime : गणेशोत्सवात दागिने चोरणारी हरियाणाची टोळी गजाआड; साडेचार हजार किलोमीटर पाठलाग करून कारवाई

Mohol News : आठव्या दिवशीही जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचे उपोषण सुरूच; प्रकृती खालावली, दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

Saudi Attack: 'हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करू नका!'... सौदीतील भारतीयांना कोणी दिला इशारा?

Kognoli Toll Protest: कोगनोळी टोलनाक्यावर तणाव! राजू शेट्टींचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील आणि पोलिसांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT