नाशिक

जलतारा शोषखड्डे निर्मितीची विशेष मोहीम

CD
ॲंकर NSK26H33368 जळगाव : जलतारा शोषखड्डे निर्मितीची विशेष मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर यांच्‍यासह अधिकारी व ग्रामस्‍थ. –––– एकाच दिवसात साडेपाच हजार जलतारा शोषखड्डे (उपशीर्षक) जिल्ह्यात विशेष मोहीम; चिंचोली येथून सुरुवात; भूजलपातळी वाढविण्यावर भर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख आणि लोकसहभागातून विकासाला चालना देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा भाग म्हणून शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यात जलतारा शोषखड्डे निर्मितीची विशेष मोहीम राबविण्यात आली. त्‍यानुसार एकाच दिवसात जिल्ह्यातील ७०७ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ५ हजार ५८८ जलतारा शोषखड्डे तयार करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायतींनी स्थानिक परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकाभिमुख विकासाच्या कामांना प्राधान्य द्यावे, या उद्देशाने जिल्हाभरात प्रयत्न केले जात आहेत. त्‍यानुसार या विशेष मोहिमेस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्‍या उपस्थितीत जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत स्तरावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जलतारा शोषखड्ड्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरणाला चालना देणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे या दृष्टीने जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती महत्त्वपूर्ण ठरते. ग्रामीण भागात पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना लोकसहभागाची जोड देण्यासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. चौकट जिल्हाभरात व्यापक जनसहभाग जिल्ह्यातील ७०७ ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ५ हजार ५८८ जलतारा शोषखड्ड्यांची निर्मिती झाली आहे. ही मोहिमेच्या व्यापकतेची निदर्शक बाब आहे. ग्रामपंचायत स्तरावरील नियोजन, स्थानिक यंत्रणेचा सहभाग आणि जलसंधारणाबाबतची जनजागृती यांच्या माध्यमातून जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात आला.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT