नाशिक

जळगाव-भादली मार्गावर उद्या वेग चाचणी

CD
जळगाव-भादली मार्गावर उद्या वेग चाचणी रेल्वेरुळांपासून दूर राहण्याचे भुसावळ विभागाचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १९ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत जळगाव–भादली या ११.५१ किलोमीटर लांबीच्या पाचव्या रेल्वे मार्गाची बुधवारी (ता. २१) रेल्वे संरक्षा आयुक्तांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी मार्गावर वेग चाचणी (स्पीड ट्रायल) घेतली जाणार असल्याने नागरिकांनी रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पाचव्या रेल्वे मार्गाच्या कार्यान्वयनाच्या दृष्टीने ही तपासणी महत्त्वाची आहे. रेल्वे संरक्षा आयुक्त, मध्य सर्कल, मुंबई यांच्यामार्फत होणाऱ्या या तपासणीदरम्यान संबंधित मार्गावर रेल्वेगाड्यांची वेग चाचणी घेतली जाणार आहे. या वेळी गाड्या अधिक वेगाने धावण्याची शक्यता असल्याने रुळांजवळ जाणे धोकादायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नागरिक, शेतकरी, शेतमजूर, मुले आणि तरुणांनी विशेष खबरदारी घ्यावी. रेल्वे रुळ ओलांडणे, रुळांच्या कडेला उभे राहणे किंवा रुळांजवळ विनाकारण जाणे टाळावे. चौकट सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन विशेषतः रेल्वे मार्गालगत शेतीची कामे करणाऱ्यांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर राखावे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाचव्या रेल्वे मार्गाची तपासणी आणि वेग चाचणी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; जंतरमंतर आंदोलन प्रकरणी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन धक्का!

Bishnoi Gang Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर मोठी खळबळ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते 'हे' काँग्रेसचे माजी आमदार!

Bhagwangad News : भगवानगडाच्या चतुर्थ महंतपदी कृष्णा महाराज शास्त्री विराजमान होणार; दुष्काळामुळे सोहळा साधेपणाने

Law Courses : विधी अभ्यासक्रमाला मुलींची पसंती; प्रवेशाचे प्रमाण ४३.३८ टक्क्यांवर

IND vs NZ, Schedule: भारताचा T20 संघ न्यूझीलंडला पोहोचला! वैभव सूर्यवंशीसोबत फॅन्सने घेतले सेल्फी, भुवीही कमबॅकसाठी सज्ज

SCROLL FOR NEXT