NSK26H32704
जळगाव : गोलाणी संकुलाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर स्वच्छता करताना महापालिकेचे कर्मचारी.
...........
मुख्य बाजारपेठेतून ३२ ट्रॅक्टर कचरा उचलला
विशेष मोहीम; कचरा साचणाऱ्या ठिकाणांवर स्वच्छता
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरातील मुख्य बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून साचलेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबविली. जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने एकूण ३२ ट्रॅक्टर कचरा उचलण्यात आला. यामुळे बाजारपेठेतील अस्वच्छता दूर करण्यासाठी मदत झाली.
आयुक्त आदित्य जिवने, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे आणि सहायक अभियंता समीर बोरोले यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (ता. १६) ही मोहीम राबविण्यात आली. प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील कचरा साचणाऱ्या प्रमुख ठिकाणांना प्राधान्य देत स्वच्छतेची कामे करण्यात आली. बांधकाम विभागाच्या ट्रॅक्टरसह जेसीबीचा वापर करून कचरा उचलण्यात आला आणि विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. मुख्य बाजारपेठेतील दायमा शाळा, सुभाष चौक, इस्लामपुरा, फुले मार्केट, बी. जे. मार्केट, आर. आर. शाळा, बळीराम पेठ, गोलाणी मार्केट आणि शाहूनगर रोड या भागांतील कचऱ्याचे ढीग हटविण्यात आले. गर्दीच्या या परिसरात कचरा साचल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या मोहिमेत मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रूपेश भालेराव, रमेश कांबळे, प्रभाग मुकादम रवी संकत, विशाल चागरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.