NSK26H32256
जळगाव : गिरणा टाकी परिसरातील हॉकर्सची हातगाडी जप्त करताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी.
.......
मुख्य रस्त्यांवरील ११ हातगाड्या जप्त
दुसऱ्या दिवशीही मनपाची अतिक्रमणविरोधात धडक मोहीम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर महासभेत महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी कारवाईचा वेग वाढविला आहे. मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठांसह वर्दळीच्या भागांत धडक मोहीम राबवून ११ हातगाड्या जप्त केल्या. तसेच एका ट्रॅक्टरमधील साहित्यही जप्त करण्यात आले.
शहरातील रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटल्यामुळे वाहतुकीसह पादचाऱ्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या अतिक्रमणांवर नियमित कारवाई होत नसल्याबाबत महासभेत महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती दिल्याचे मंगळवारच्या कारवाईवरून दिसून आले.
चौकट
या भागात झाली कारवाई
महापालिकेच्या पथकाने गांधी बगीचा, स्टेडियम परिसर, भास्कर मार्केट, जिल्हा परिषद अध्यक्षांचा बंगला, गिरणा टाकी परिसर, गोलाणी मार्केट आणि फडगल्ली येथे कारवाई केली. या भागांत रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांसह अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.