NSK26H32467
जळगाव : व. वा. वाचनालय येथील प्रेरणा दिनानिमित्त वाचन करताना खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जिवने, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन.
.............
शहरात व. वा. वाचनालय मार्गाचे लोकार्पण
१५० वर्षांच्या वाचनपरंपरेला नवी ओळख; महापौर काळेंच्या पुढाकारातून नामकरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातील वाचनसंस्कृतीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या वल्लभदास वालजी (व. वा.) जिल्हा वाचनालयाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्याला ‘व. वा. जिल्हा वाचनालय मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. या नामफलकाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १५) करण्यात आले. या निर्णयामुळे वाचनालयाच्या ऐतिहासिक वाटचालीला शहराच्या नकाशावर स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
महात्मा गांधी मार्गावरील व. वा. वाचनालयाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामकरण करण्यात येवून हा नामफलक लावण्यात आला आहे. नामकरण सोहळ्याला मनपा आयुक्त आदित्य जिवने, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सीए अनिलकुमार शाह आणि चिटणीस प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नामकरणाची कार्यवाही पूर्ण केल्याबद्दल वाचनालय प्रशासनाने महापौर काळे यांचे आभार मानले.
वाचनालयाला दीडशे वर्षाची परंपरा
वाचनालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने या मार्गाला वाचनालयाचे नाव देण्यात यावे. अशी मागणी वाचनालय प्रशासनाने महापौर दीपमाला काळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर महापौरांनी या मागणीचा पाठपुरावा करत नामकरणाचा प्रस्ताव महासभेत मांडला. खासदार स्मिता वाघ आणि आमदार सुरेश भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात आली. अखेर महासभेच्या ठराव क्रमांक ६५ नुसार या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
चौकट
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष उपक्रम
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त वाचनालयात विशेष वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी वाचनालयात येऊन किमान दहा मिनिटे पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाची नोंद विविध रेकॉर्ड बुकमध्ये करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.