NSK26H32900
जळगाव : होमहवन पुजेसाठी बसलेल्या जोडप्यांकडून सुरू असलेले पुजन.
--------------
अनेक मंडळांकडून होमहवन, कन्या पूजन
-----
सप्तमी तिथीच्या वृद्धीमुळे नियोजन; आज अष्टमीचा उपवास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : शहरासह जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यंदा सप्तमी तिथी वृद्धी असल्याने अनेक दुर्गोत्सव मंडळांकडून रविवारी (ता.१८) ठिकठिकाणी होमहवन व कन्या पूजन केले गेले. यंदा तिथींच्या अद् भूत संयोगामुळे कन्या पूजन व हवनाचा काळ अत्यंत विशेष मानला जात आहे. सोमवारी (ता.१९) अष्टमीचा उपवास केला जाणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उत्सव साजरा केला जात आहे. देवीची स्थापना केल्यापासून रात्री गरबा– दांडीया खेळणाऱ्यांचीदेखील धूम सुरू आहे. उत्सव आत अंतिम टप्प्यात असून, देवी मंदिरांत होमहवन, कन्या पूजन आदी विधींचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (ता.१८) सायंकाळी अष्टमी लागल्याने काही ठिकाणी सायंकाळनंतर कन्या पूजन करीत भोजन करण्यात आले.
देवीची आराधना
नवरात्रोत्सवानिमित्ताने मंदिरांत मंत्रोच्चारात होमहवन करण्यात आले. पुरोहितांच्या उपस्थितीत विधी पार पडले. अद्याप नऊ दिवसांचे उपवास सुरू असलेल्या देवीला दही व फळांचा नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. अनेक भाविकांनी कुटुंबासह मंदिरात उपस्थित राहून होमहवनाचे दर्शन घेतले.
शक्तिस्वरूपाचा सन्मान
नवरात्रोत्सवात कन्येला देवीचे स्वरूप मानून पूजन करण्याची परंपरा आहे. त्यानुसार विविध मंडळांत व घरोघरी चक्र पूजन, लहान मुलींचे पूजन करून त्यांना भोजनासह भेटवस्तू देण्यात आल्या. या उपक्रमातून स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान, सोमवारी (ता.१९) अष्टमीचा उपवास असून, सायंकाळी साडेसहाला अष्टमी संपेल. त्यामुळे काहींनी आजच कन्या पूजन केले, तर काही ठिकाणी सोमवारी (ता.१९) सकाळी कन्या पूजन व होमहवन केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.