नाशिक

शहरातील कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटवर कारवाईची प्रतीक्षा घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायम

CD
मेन फिचर टुडे ३ : NSK26H33296 जळगाव : गेंदालाल मिल भागात पडलेला कचरा. -------------- NSK26H33297 शिवाजीनगर लाकूडपेठ भागात रस्त्याच्या बाजूला जमलेला कचरा. ------------ NSK26H33298 आर. आर. शाळेच्या मागील गल्लीत रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा. --- शहरात कचऱ्याचे ‘ब्लॅक स्पॉट’; कारवाईची प्रतीक्षा घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा प्रश्न कायम; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : शहरातील विविध भागांत निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटचा प्रश्न कायम असून, या ठिकाणी नियमित स्वच्छता आणि कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये तसेच नागरी वस्त्यांजवळ साचणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील गेंदालाल मिल परिसर, शिवाजीनगरातील लाकूडपेठेचा भाग, आार. आर. शाळेलगत, मानराज पार्कजवळील समांतर रस्त्यालगतचा परिसर, शाहूनगर खानदेश मिल कॉम्प्लेक्सचालगता परिसर यासह काही ठिकाणी कचरा साचत असल्याने ब्लॅक स्पॉटची समस्या कायम आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्यास परिसरात अस्वच्छता वाढते. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा संकलनाची नियमित व्यवस्था, ब्लॅक स्पॉटची वेळोवेळी स्वच्छता आणि नागरिकांमध्ये जनजागृती या बाबींवर भर देणे गरजेचे आहे. कचरा टाकण्यास प्रतिबंध असलेल्या ठिकाणी सूचना फलक लावणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. महापालिकेने या समस्येवर ठोस उपाययोजना करून शहरातील अस्वच्छता दूर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नागरिकांमध्ये नाराजी कचऱ्याची समस्या वारंवार उद्भवत असल्यास केवळ साफसफाई करून उपयोग नाही. कचरा टाकण्यावर नियंत्रण आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट शोधून त्यांची नियमित पाहणी करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. चौकट दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त शहरात अनेक भागांत कचरा साचलेल्या ठिकाणांहून येणाऱ्या दुर्गंधीचा परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामुळे माशा, डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. ब्लॅक स्पॉटवरील कचरा उचलण्याबरोबरच त्या ठिकाणी वारंवार कचरा साचू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुर्घटनांमध्ये ७२० मृत्यू! साडेसहा वर्षांत २,४०८ जखमी, आगींमध्ये सर्वाधिक हानी; धक्कादायक अहवाल समोर

ZODIAC PREDICTIONS: मीन राशीत शनि-चंद्राची युती, तयार झाला विष योग; पुढचे ३ दिवस तुमच्या राशीसाठी कसे असणार? जाणून घ्या राशीभविष्य

Raj Thackeray: 'हा लोकशाहीचा खुन आणि बलात्कारच', व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरेंचा घणाघात; ट्विट करत म्हणाले...

इलॉन मस्कला विसरा! इंजिनिअरिंगचं शिक्षण न घेता उत्तराखंडच्या तरुणानंही बनवली उडणारी कार; १३ वर्षांची मेहनत फळाला

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT