नाशिक

वळण रस्त्यावर क्रेन कोसळून चालक ठार

CD
मेन फिचर : टुडे पान १ (फोटो आजच्या प्रमाणे एक फोटो मोठा वापरावा) NSK26H33393, NSK26H33394 जळगाव : बाह्यवळण (बायपास) मार्गावरील पुलावरून खाली पडलेली क्रेन. -------------- NSK26H33395 पुलाचा खचलेला भाग. --- पूल दुरुस्तीदरम्यान क्रेन शंभर फुटावरून कोसळली उपशीर्षक चालकाचा मृत्यू; बाह्यवळण रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीत विघ्न सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : राष्ट्रीय महामार्गावर पाळधी- तरसोद वळण रस्त्यावरील (बायपास) असोदा गावाजवळील खचलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीत शुक्रवारी (ता.२४) आणखी एक विघ्न आले. दुरुस्तीच्या कामादरम्यान क्रेन शंभर फूट उंचावरुन खाली कोसळल्याची घटना घडली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यामुळे पुलाच्या कठड्याचे मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण कामाच्या दर्जाबाबत आधीच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून वळणरस्ता बंद असल्याने जळगाव शहरातून वाहतूक वळविल्यामुळे अपघात वाढले आहेत. त्यातून जनक्षोभ निर्माण होत असून त्यातच हा अपघात घडल्याने हे काम आणखी लांबणीवर पडून शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. पावसाळ्यात ३१ जुलैस जळगाव जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे महामार्गावरील पाळधी- तरसोद वळणरस्त्यावर (बायपास) असोदा गावानजीक असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचा भाग खचल्याने हा पूल १ ऑगस्टपासूनच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आल्यामुळे शहरातील महामार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. वायर रोप तुटल्याने अपघात दम्यान, पाावसाळ्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम सुरु असताना आज दुपारी एका क्रेनच्या सहाय्याने गर्डर हलविण्याचे काम सुरू होते. क्रेन पुलावर काम करीत असताना वायर रोपने गर्डर उचलल्यानंतर वायर रोप तुटल्यामुळे क्रेनचा तोल जाऊन हा क्रेन शंभर फूट खाली कोसळला. या अपघातात क्रेनवरीलचालक मधुकर धनराज पाटील (वय ४१ वर्षे, रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) हे क्रेनखाली दबले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूनेच सुरु असलेली वाहतूक काही वेळासाठी बंद झाली होती. घटनास्थळी पाळधी पोलिस चौकीचे सहाय्यक निरीक्षक गणेश कोते यांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले व वाहतूक सुरळीत केली. घटनेची माहिती मिळताच प्रताप पाटील यांनीही जिल्हा रुग्णालयात जाऊन मृताच्या नातलगांचे सांत्वन केले. ----- चौकट दुरुस्ती कामात विघ्न मुळात ३१ जुलैस झालेल्या अतिवृष्टीने पुलाचा भाग खचल्यानंतर या पुलाच्या व एकूणच महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामाला आधीच खूप विलंब झाला आहे. पुलाच्या खचलेल्या भागाची पाहणी तज्ज्ञांच्या पथकाने केली, त्यानंतर त्यांनी अहवाल सादर करुन दुरुस्तीचे कार्यादेश संबंधित मक्तेदारास देण्यात आले. आता या अपघाताने दुरुस्तीच्या कामात विघ्न आले असून हे काम आणखी लांबणीवर पडणार आहे. ------ कोट पुलाच्या दुरुस्तीदरम्यान हा अपघात क्रेनचा तोल गेल्याने घडला. त्यात चालकाचा मृत्यू झाला. क्रेन बऱ्याच उंचीवरुन कोसळल्याने पुलाच्या कठड्याचेही नुकसान झाले. तरीही दुरुस्तीचे काम सुरुच राहील. तीन महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येईल. - बी. एस. साळुंखे प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price fall before Dhanteras Diwali : धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! एकाच झटक्यात दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे भाव..!

फटाके बनवताना भीषण स्फोट! ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Maharashtra weather cyclone update : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस खोडा घालणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Data Security : डेटा सुरक्षेत हलगर्जी भोवणार; आस्थापनांवर दंडाची टांगती तलवार; सहकारी बॅंका आणि पतसंस्थांनाही नियमावली लागू

SCROLL FOR NEXT