नाशिक

जळगावात सात कोटींच्या विकासकामांना गती

CD
टुडे एक ॲंकर (महापालिका इमारतीचा फोटो वापरावा) --- शीर्षक जळगावात सात कोटींच्या विकासकामांना गती नगरसेवकांच्या प्रस्तावांतून गरजेची कामे; आयुक्तांच्या नियोजनातून निधीचा समन्वय सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १२ : शहरातील विविध प्रभागांतील नागरी सुविधांची गरज लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सुमारे सात कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन केले आहे. रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटारी आणि स्लॅब कल्व्हर्टच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. नगरसेवकांकडून आलेल्या प्रस्तावांची छाननी करून आवश्यक कामांची निवड करण्यात आली असून, काही कामांना मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रभागनिहाय विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महासभेत विकासनिधीच्या वाटपावरून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत मतभेद निर्माण झाले होते. त्यावेळी महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्येक नगरसेवकाला ५३ लाख रुपयांचा समान निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगरसेवकांनी विविध कामांचे प्रस्ताव सादर केले. मात्र, प्रस्तावित कामांची संख्या आणि निधीची उपलब्धता यांचा मेळ घालण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. आयुक्तांनी तिजोरीतील उपलब्ध निधीचा विचार करून अत्यावश्यक कामांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर नगरसेवक आणि प्रशासन यांच्यातील चर्चेतून कामांची निवड करण्यात आली. प्रभागनिहाय कामांचे नियोजन महापौर दीपमाला काळे यांच्या प्रभाग सातमध्ये गंधर्व कॉलनी, भाग्योदय सोसायटी परिसरातील गटारी आणि स्लॅब कल्व्हर्ट बांधण्यासाठी ५८.०३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रभाग दोनमधील कलावसंत नगरच्या डांबरीकरणासाठी ४९ लाख, तर प्रभाग १६ मधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४९ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. आमदार सुरेश भोळे यांच्या सूचनेनुसार प्रभाग तीनमधील खेडी शिवारातील रस्त्यांसाठीही ४९ लाख रुपयांचा समावेश आहे. या प्रभागात अशी आहेत कामे.. उपमहापौर मनोज चौधरी यांच्या प्रभाग नऊमध्ये रस्ते काँक्रिटीकरण आणि गटारींसाठी ३९.५८ लाख रुपये, तर प्रभाग १२ मध्ये डांबरीकरण व गटार बांधकामासाठी ४४.३९ लाख रुपये प्रस्तावित आहेत. प्रभाग १३ मधील मोहाडी रस्ता ते शिरसोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ३५.०८ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या प्रभागात ३० लाख, प्रभाग चारमधील जोशी पेठ परिसरातील रस्त्यांसाठी २५ लाख, तर विशाल भोळे, शुचिता हाडा आणि ललित कोल्हे यांच्या प्रभागांत प्रत्येकी २५ लाख रुपयांची कामे निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग तीनमध्ये जान्हवी हॉटेल ते जुना खेडी रस्ता तसेच शंकरराव नगरमधील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अडीच कोटी रुपयांहून अधिक निधीचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. मात्र, या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मेहरूण स्मशानभूमी परिसरातील गटार आणि स्लॅब कल्व्हर्टसाठी २७.९९ लाख रुपयांचे प्रस्तावही तयार करण्यात आले आहेत. चौकट उपलब्ध निधी आणि विकासकामांचा मेळ आयुक्तांनी सर्व प्रस्तावांना सरसकट मंजुरी देण्याऐवजी उपलब्ध आर्थिक तरतूद आणि कामांची निकड यांचा विचार करून प्राधान्यक्रम निश्चित करण्यावर भर दिला. नगरसेवकांच्या मागण्या आणि प्रशासनाची आर्थिक मर्यादा यांत समन्वय साधण्याचा प्रयत्न यातून दिसतो. त्यामुळे निधीचे नियोजन करताना आवश्यक नागरी सुविधांना प्राधान्य देऊन विकासकामे मार्गी लावण्याची प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा..

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT