फ्लायर
''
(पाणी दूषितचे संग्रहित चित्र वापरावे)
जिल्ह्यात २२ पाणी नमुने दूषित; रावेरमध्ये सर्वाधिक गावांचा समावेश
(उपशीर्षक)
आरोग्य विभागाकडून सप्टेंबरमध्ये १,७३५ नमुन्यांची तपासणी; पाऊस नसल्याने नमुने झाले कमी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सप्टेंबर २०२६ मध्ये केलेल्या तपासणीत एकूण १ हजार ७३५ पाणी नमुन्यांपैकी २२ नमुने दूषित आढळले आहेत. जिल्ह्याची दूषित नमुन्यांची टक्केवारी तीन टक्के नोंदविण्यात आली आहे. दरम्यान दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची तपासणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्रामुख्याने पावसाळ्यात पाण्याचे नमुने तपासणी केली जात असते. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होत असल्याने पाणी तपासणी केली जात असते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात देखील तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पाणीसाठे आणि भूजल उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणे, पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे ठरते.
रावेरमध्ये सर्वाधिक दूषित नमुने
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार रावेर तालुक्यात तपासलेल्या पाणी नमुन्यांपैकी जिल्ह्यात सर्वाधिक नऊ नमुने दूषित आढळले असून, हे प्रमाण सात टक्के आहे. तर भडगाव तालुक्यात ७३ नमुन्यांपैकी तीन नमुने दूषित आढळले असून, प्रमाण चार टक्के नोंदविण्यात आले आहे. एरंडोलमध्ये ६९ नमुन्यांपैकी दोन नमुने दूषित असून, प्रमाण तीन टक्के आहे. चाळीसगाव आणि मुक्ताईनगर तालुक्यांत प्रत्येकी दोन दूषित नमुन्यांची नोंद झाली आहे. तर अमळनेर, भुसावळ, धरणगाव आणि पारोळा या तालुक्यांत प्रत्येकी एक पाणी नमुना दूषित आढळला आहे.
इन्फो
दूषित नमुने आढळलेली गावे
रावेर : वडगाव, सुतगाव, रणगाव, गहुखेडा, तासखेडा, रायपूर, लुमखेडा, बोरखेडा, केर्हाळे, अमळनेर : धानोरा, भडगाव : पिंपळगाव बुद्रुक., पिचर्डे, बात्सर, भुसावळ : कंडारी, चाळीसगाव : दस्केबर्डी, टेकवाडे खुर्द, धरणगाव : चोरगाव, एरंडोल : उत्राण गु.ह., उत्राण अ.ह., मुक्ताईनगर : कुंड, चिंचखेडा बुद्रुक, पारोळा : रताळे
–––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.