नाशिक

शिरपूर : खेळाडू राष्ट्रीय यश बातमी

CD
SHC26B13525 शिरपूर : जयेश मिरकरचे कौतुक करतांना सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रीतेश पटेल आदी. --------------- पटेल सीबीएसईचा जयेश मिरकर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र शिरपूर, ता. २२ : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई संचलित तांडे (ता. शिरपूर) येथील मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी जयेश मिरकर याची सीबीएसई राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी नुकतीच निवड करण्यात आली. लोणावळा येथे आयोजित १७ वर्षांखालील सीबीएसई दक्षिण विभागीय- २ क्रिकेट स्पर्धेत त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत त्याने आपले स्थान निश्चित केले. शाळेचा दुसरा विद्यार्थी नैतिक चौधरी यानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत लक्षवेधी कामगिरी बजावली. या दोन्ही खेळाडूंनी एकूण ९०० खेळाडूंमधून अव्वल ६० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्यांच्या संघाने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध सीबीएसई शाळांचे संघ सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर तो तामिळनाडूतील मदुराई येथे १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान होत असलेल्या सीबीएसई राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, प्रीतेश पटेल, प्राचार्या श्रीमती मंजू सिंह, क्रीडा संचालक किरण आंचन, क्रीडा समन्वयक कुणाल सुर्वे, धीरज पाटील यांनी कौतुक केले. त्यांना क्रिकेट प्रशिक्षक दीपक जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Statement : सांगली जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा पदवीधर निवडणुकीवर परिणाम? विश्वजीत कदम स्पष्टच म्हणाले!

IND vs NZ 1st T20I: भुवनेश्वर कुमारच्या 'कमबॅक'ची चर्चा... पण न्यूझीलंड फलंदाजांचा दबदबा, भारतासमोर सर्वोच्च धावसंख्या...

90 कोटींचं कर्ज, 55 खटले अन् बँक खात्यात शून्य रुपये; अमिताभ बच्चन यांनी पुन्हा कसं उभं केलं 4000 कोटीचं साम्राज्य?

Latest Marathi News Live Update : सौरव दास, आशुतोष रांका आज दिल्ली पोलीस गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

Satara Crime: घरामागील शेतात महिलेचा मृतदेह; घरात पती गंभीर जखमी, दहिवडीतील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT