नाशिक

आरोपीच्या शिक्षेची अंमलबजावणी करा

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H32998 धुळे : डोंगराळेच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी दोषी विजय खैरनारला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात चिमुकलीला श्रद्धांजली अर्पणप्रसंगी अल्पा अग्रवाल यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी. --- आरोपी खैरनारच्या शिक्षेची त्वरित अंमलबजावणी करा --- डोंगराळेतील बालिका अत्याचार प्रकरण; भाजप महिला पदाधिकाऱ्यांकडून चिमुकलीला श्रद्धांजली सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १९ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील चाडेचारवर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपी विजय खैरनारला मालेगाव येथील विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या दहा महिन्यांत न्यायव्यवस्थेसह शासनाने या प्रकरणी जलदगतीने न्याय मिळवून दिल्याने समाधान व्यक्त करत भाजपच्या येथील महिला पदाधिकाऱ्यांनी पीडित चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आता आरोपीला झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. डोंगराळे (ता.मालेगाव) येथे १६ नोव्हेंबर २०२५ ला दुपारी घराबाहेर खेळत असताना साडेचारवर्षीय चिमुकली अचानक गायब झाली होती. या प्रकरणी गावातीलच विजय खैरनार (वय २४) याने तिचे अपहरण करत तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे डोंगराळे गावासह संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी त्याच दिवशी आरोपी विजय खैरनारला अटक केली होती. या प्रकरणी १६ ऑक्टोबर २०२६ ला न्यायालयाने हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ मानत आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा अमलात आणा आता आरोपीला झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करत पिडीत बालिकेला खरा न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अग्रवाल, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री अहिरराव, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका प्रतिभा चौधरी, कल्पना महाले, कल्याणी अंपळकर, मोहिनी धात्रक, संगीता चौधरी, छाया पाटील, सुरेखा ठाकरे, राजश्री निकम, सुवर्णा बडगुजर, सुनीता पाटील यांनी शासनासह न्यायव्यवस्थेचे आभार मानले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT