नाशिक

डोंगराळेतील चिमुकलीला न्याय; आरोपीला फाशीची शिक्षा

CD
डोंगराळे घटनेत आरोपीला फाशी सुनावल्याने अखेर न्याय मिळाला सुवर्णकार सेनेची प्रतिक्रिया; शाखेनेही दिले होते निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. मात्र, चिमुकलीच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणात पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी विविध स्तरांतून मागणी करण्यात आली होती. महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीनेही पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली होती. चिमुकलीवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी संघटनेने भूमिका मांडली होती. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने न्यायासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची भावना महाराष्ट्र सुवर्णकार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. चिमुकलीला श्रद्धांजली चिमुकलीला न्याय मिळाला असला, तरी तिचे कुटुंबीय आणि समाजाच्या मनातील दुःख कायम राहणार आहे. तिच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT