नाशिक

शिक्षेची लवकरच अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा- ॲड. उज्वल निकम

CD
शिक्षेची लवकरच अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा : ॲड. निकम सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १६ : डोंगराळे येथील पीडित बालिकेवर अत्याचार व तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला न्यायदेवतेने फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेतून समाजात असे दुष्कृत्य पुन्हा कोणी करणार नाही, असा संदेश गेला आहे. शिक्षेची पूर्तता व्हायला हवी. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही उच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. डोंगराळे प्रकरणी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रपतींकडून दयेचा अर्ज लवकर निकाली निघेल, अशी आशा असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सव्वाचारवर्षीय पीडित चिमुकली आरोपीला दादा म्हणायची. त्याने केलेल्या दृष्कृत्यामुळे दादा या शब्दाचा व नात्याचाही खून झाला आहे. पीडिता हुशार होती. बी म्हणजे बॉल, सी म्हणजे कॅट अशी ती बोलत असतानाचा व्हिडिओ शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मला दाखविला. व्हिडिओ पाहताना माझ्या मनात थरकाप उडाला. आरोपी नरपशू असू शकतो. त्याच्या अत्याचाराने चिमुरडी रक्तबंबाळ झाली. न्यायालयाने आरोपीला फाशीची, तसेच अपहरण व पुरावा नष्ट केल्याने सात वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. पीडित कुटुंबीयांना दहा लाखांची मदत मंजूर केली. या प्रकरणात प्रत्यक्ष घटना पाहणारा साक्षीदार नव्हता. सीसीटीव्ही फुटेज नव्हते. तपास अधिकारी यशवंत बाविस्कर, निरीक्षक प्रीतम चौधरी, प्रीती सावंजी, श्री. काळे, संभाजी पिरनाईक, संतोष गुगले आदींनी परिस्थितीजन्य पुरावे जमा केले. मंत्री भुसे यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी हा खटला चालविण्याबाबत मला आग्रह धरला. युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयातील बोपरा खटल्यातील सहा वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाचा न्यायनिवाडा सादर केला. सदर खटला व डोंगराळे घटनेत साम्य असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. न्यायालयाने आरोपीला याआधीच दोषी ठरविले होते. आरोपीने केलेल्या कृत्याची व पश्‍चातापाची भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तो धीटपणे निरखून पाहत होता. वय कमी आहे, घरची परिस्थिती नाजूक आहे, हा शिक्षा कमी करण्यासाठीचा त्याचा दावा आम्ही युक्तिवादात फेटाळून लावला. समाजाला अशा वृत्ती घातक ठरू शकतात. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्याच्या शिक्षेची लवकर अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा ॲड. निकम यांनी व्यक्त केली.

IND W VS ZIM W: संकटमोचक बनून आली दीप्ती शर्मा! झिम्बाब्वेविरुद्ध २७ धावांत ४ विकेट्स गमावल्यानंतरही भारताचा थरारक विजय

Bombay High Court Decision : महाराष्ट्रात दिवाळीत फटाके फोडण्यावर निर्बंध; मुंबई उच्च न्यायालयाचा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय!

Delhi Protest High Voltage : "ज्ञानेश कुमारांना भारतरत्न द्या!"; सीजेपीच्या 'तिरंगा यात्रे'दरम्यान अभिजीत दिपकेंविरोधात घोषणाबाजी, 'मोदी-मोदी'च्या नाऱ्यांनी दणाणला परिसर

Albatya Galbatya 2.0 Drama : ‘अलबत्या गलबत्या’ने रचला इतिहास; सलग सात प्रयोगांचा ‘शिखर विश्वविक्रम’

Badnapur Drought : ‘पाच हजारांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आर्त सवाल; रामदास आठवले यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

SCROLL FOR NEXT