नाशिक

सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात

CD
पान दोन मेन ------------------- 05122 लखमापूर : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगाम प्रसंगी उसाची मोळी गव्हाणीत टाकताना खासदार भास्कर भगरे, दत्तात्रेय पाटील, श्रीराम शेटे, शिवाजी बस्ते आदी. कादवाच्या भरभराटीसाठी जास्ती जास्त ऊस लागवड करावी खासदार भास्कर भगरे : सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात सकाळ वृत्तसेवा लखमापूर ता. २१ : ऊस उत्पादकांची वेळेत तोडणी व्हावी यासाठी कादवा कारखान्याने विस्तारीकरण हाती घेतले असून, कारखाना कार्यक्षेत्राबरोबरच निफाड, पेठ, नाशिक आणि इगतपुरी तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही आधार देत आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याच्या भरभराटीसाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी,असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील, कारखाना अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष शिवाजी बस्ते, सर्व संचालक मंडळ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. दुष्काळी स्थितीत धरणांचे पाण्याचे योग्य नियोजन करत शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ व आपण सदैव तत्पर राहू असे खासदार भगरे यांनी सांगितले. पाटील म्हणाले की, कादवा कारखान्याच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत सर्व आजी माजी अध्यक्ष, संचालक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. साखर उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करत असताना श्रीराम शेटे आणि त्यांच्या संचालक मंडळाने कारखान्याची गाळप क्षमता १२५० मेट्रिक टनांवरून ३५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढविली. तसेच इथेनॉल प्रकल्प उभारला. हे काम कौतुकास्पद आहे. माजी संचालक संजय पडोळ, माजी सभापती सदाशिव शेळके, बाजार समितीचे संचालक गंगाधर निखाडे आणि युनियनचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, अशोक वाघ, अनिल देशमुख, विलास कड, बाळासाहेब देशमुख, दत्तात्रेय जाधव , अरुण देशमुख, भारत खांदवे कारखान्याचे सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक हेमंत माने आदी उपस्थित होते. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन तर संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले. गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त त्र्यंबक ढगे, जालंदर गायकवाड, नानासाहेब देशमुख, प्रवीण देशमुख आणि भाऊसाहेब निरगुडे यांच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले. --------- चांगला भाव देण्याची परंपरा कायम राखणार : शेटे शेटे म्हणाले की, कादवा कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादकांचे हित जोपासले असून, जिल्ह्यात चांगला भाव देण्याची परंपरा यंदाही कायम राखली जाईल.विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच नवीन प्रकल्प सुरू होऊन पूर्ण क्षमतेने गाळप करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या घरातूनच SIR ला विरोध? २३ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनात पती परकला प्रभाकर होणार सहभागी

‘तुम्ही Gen Z नाही!’ दिल्ली हायकोर्टानं सौरभ दास अन् आशुतोष रांका यांना सुनावलं; फ्रान्समधील जाळपोळीच्या घटनांचाही केला उल्लेख...

Shark Tank USA: भारतीय तरुणाचा अमेरिकेत डंका! फक्त 2 चमच्यांच्या आयडियासाठी मिळाली ₹3.3 कोटींची ऑफर

Latest Marathi News Live Update : बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मागणी

PM Kisan Samman Nidhi: दिवाळीपूर्वी पीएम किसानचे २,००० रुपये मिळणार शेतकऱ्यांना मिळणार का? २४व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT